बार्शीतला प्राध्यापक देशभर गाजला; 'बुचाड' मधून मांडली शेतक-यांची वेदना

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या बार्शीतल्या एका तरुण प्राध्यापकानं बनवलेल्या लघुचित्रपटाला तेलंगणामधील एका राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे.

मुंबई - मनात आणलं तर काही अशक्य नाही. जे आवडीचे आहे ते काम केलं की यश मिळतचं. असे म्हटले जाते. एका प्राध्यापकानं मनात चित्रपट तयार करण्याचं वेड घेतलं आणि ते पूर्ण करुन दाखवलं. बार्शीतल्या या प्राध्यापकाची सध्या सगळीकडे मोठया प्रमाणावर चर्चा आहे. प्रा. विशाल गरड असे त्यांचे नाव असून त्यांनी बुचाड शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. त्याचा देशपातळीवर गौरव झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या बार्शीतल्या एका तरुण प्राध्यापकानं बनवलेल्या लघुचित्रपटाला तेलंगणामधील एका राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे.  प्रा. गरड यांनी बुचाडचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या लघुपटाला तेलंगणातील एक महोत्सवात पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.  झहिराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल कम्युनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हल या राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ही बातमी कळताच गरड यांच्यावर सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

बार्शीतल्या तरुण प्राध्यापकाची भरारी, तेलंगणाच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बुचाड' सर्वोत्कृष्ट

विशाल गरड यांनी हा पुरस्कार शेतकरी वेशभूषा करुन त्यांनी स्वीकारला आहे. आणि   तो अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तयार केलेल्या 'बुचाड' या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. बुचाड या लघुचित्रपटाला हा बहुमान मिळाल्यानं सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. 

'बघीराचा' धूर; प्रभुदेवाचा 'सणकी' अवतार व्हायरल

दोन दिवसांत अडीच कोटी व्ह्युज; इमरान हाश्मी बॅक, 'लुट गए' रिलीज    

याबद्दल आपली प्रतिक्रिया देताना गरड म्हणाले की, दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख 'बुचाड' या लघुचित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न केला आहे. नॅशनल कम्युनिटी मीडिया फिल्म फेस्टिव्हल या राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार युनेस्कोचे प्रा.प्रविण पवार यांच्या हस्ते विशाल गरड यांना प्रदान करण्यात आला.

May be an image of 3 people, including Sachin Varpe

याप्रसंगी डी.डी.एसचे डायरेक्टर पी.व्ही.सतीश, प्रसिध्द तेलगु दिग्दर्शक नाग अश्विन, राजेंद्र पाटील, चिन्ना परसम्मा, हैदराबाद विद्यापीठातील प्रा.कांचन मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.'बुचाड'चे छायाचित्रण सचिन नलावडे यांनी केले आहे तर संकलन अमोल लोहार यांनी केले आहे. या लघुचित्रपटात विशाल गरड, वैष्णवी जानराव, वैष्णवी काळे, कादंबरी गरड यांच्या मुख्य भूमिका आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi man professor Solapur barshi vishal garad buchad wins telangana national film festival best short film award