सुबोध भावे सोबत 'फुलराणी' आहे तरी कोण?

चाहत्यांना पसंत पडतोय सुबोधतचा डॅशिंग लूक.
subodh bhave
subodh bhaveinstagram

लोकमान्य-एक युगपुरुष ,कट्यार काळजात घुसली, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर,बालगंधर्व अशा अनेक सिनेमातून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा हरहुन्नरी मराठी अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदाच फुलराणी या सिनेमात रोमॅंटिक अंदाजात दिसणार आहे. विश्वास जोशी दिग्दर्शित या सिनेमाचं पहिलावहिलं मोशन पोस्टर आज रीलिज करण्यात आला आहे. यामध्ये डॅशिंग लूकमधला सुबोध आणि पाठमोरी असलेली फुलराणी पाहून चाहत्यांची सिनेमाविषयी उत्सुकता वाढलीय याचा अंदाज या पोस्टरला मिळालेले व्ह्यूज आणि कमेंट्स पाहून येतो. २०२२ मध्ये सिनेमा रिलिज होणार असल्याचे संकेत सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिले आहेत.

या सिनेमाला संगीत मराठीतील 'मेलडी किंग' म्हणून ज्याची सध्या ओळख आहे अशा संगीतकार निलेश मोहरीरने दिलंय. तर यातील दोन गाणी गुरू ठाकूरने लिहिली असून एक बालकवींची फुलराणी कवितासुद्धा संगीतबद्ध करण्यात आली आहे. वैशाली सामंत,स्वप्निल बांदोडकर अशा अनेक दिग्गज गायकांनी या सिनेमातली गाणी गायली आहेत. आपल्या आतापर्यंतच्या संगीत कारकिदीर्तील सगळ्यात उत्कृष्ट अलब्मपैकी हा एक अलब्म असल्याचं संगीतकार निलेश मोहरीर म्हणाला. सिनेमाचं नाव जरी 'फुलराणी' असलं तरी पु.लं नी मराठी रुपांतरण केलेल्या 'ती फुलराणी' ह्या नाटकावर आधारित हा सिनेमा नाही. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या 'पिग्मॅलियन' या मुळ नाटकावर आधारित हा सिनेमा आहे, असेही निलेश मोहरीर म्हणाला. हा सिनेमा पिरीयॉडिक नसून आजच्या काळातलाच हा सिनेमा असल्याचंही त्याने आवर्जून सांगितलं.

subodh bhave
लारा दत्ताचं डेटिंग?; ट्रोल करणाऱ्यांना फटकारलं....

सुबोध भावे म्हणजे प्रयोगशील अभिनेता. पण प्रयोग करताना तो फसणार नाही,रसिक प्रेक्षकांना तो आवडेल ह्याचीही तो नेहमी कटाक्षाने काळजी घेतो. त्यामुळे फुलराणी सिनेमा कसा असेल आणि पोस्टरवर पाठमोरी दिसणारी सिनेमातील फुलराणी कशी असेल ह्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com