'अठरा वर्षाखालील प्रेक्षकांनी 'वरण भात लोन्चा' पाहू नये'

महिलांविषयी आदरच पण...'वरण भात लोन्चांच्या' दिग्दर्शकांचा खुलासा!
varan bhat loncha kon nai koncha
varan bhat loncha kon nai koncha

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर (marahi hindi movie director mahesh manjrekar) हे त्यांच्या हटक्या कलाकृतींसाठी ओळखले जातात. त्यांच्या आतापर्यतच्या फिल्मोग्राफीकडे (filmography of majrekar) नजर टाकल्यास आपल्याला त्यांचा आवाका लक्षात येईल. वास्तव, हाथियार, अस्तित्व, विरुद्ध, कोकणस्थ, नटसम्राट आणि आता वरणभात लोन्चा अन् कोन नाय कोंचा हा चित्रपट. त्यावरुन मांजरेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्य महिला आयोगानं त्या चित्रपटाच्या ट्रेलरवर (movie trailer) आक्षेप घेतला होता. त्यामुळे मांजरेकर यांना त्या चित्रपटांमधील दृष्यांना कात्री लावावी लागणार आहे.

यासगळ्या प्रकरणात मांजरेकर (manjrekar) यांनी आपली बाजु मांडली आहे. त्यांनी सोशल मीडीयावर या प्रकरणी एक पत्रकही जाहीर केलं आहे. ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत. नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा चित्रपट १८ वर्षे वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच असल्याने सेन्सॉर बोर्डानेही याला 'ए' प्रमाणपत्र दिलं आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. समाजातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली आहेत.

नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाचा जुना ट्रेलर ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित करण्यात आला होता, त्या सर्व ठिकाणांहूनही काढण्यात आला असून, सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येत आहे. जुना प्रोमो त्वरीत काढून नवीन प्रकाशित करण्याच्या सूचनाही संबंधित माध्यमांना करण्यात आल्या आहेत. चित्रपटाच्या निर्मितीसंस्थेपासून लेखक-दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ असे आम्ही सर्व जण तमाम स्त्रियांचा मनापासून आदर करतो. समाजातील सर्व महिलांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा अजिबात हेतू नाही.

त्यामुळे प्रोमोच्या माध्यमातून काही चुकीचा संदेश समाजामध्ये जाणार नाही याचा कटाक्षाने प्रयत्न करण्यात आला आहे. असे असले तरीही नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या प्रोमोमधील काही दृश्यांतून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये केवळ प्रोमोमधूनच नव्हे, तर मुख्य चित्रपटातूनही वगळण्यात आली आहेत. सेन्सॉरने 'ए' सर्टिफिकेट दिल्यानंतरही जी दृश्ये संवेदनशील वाटतात आणि भविष्यात ज्याचा त्रास होऊ शकतो असे वाटते ती दृश्ये आम्ही चित्रपटातूनही वगळत आहोत.

नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाची प्रसिद्धी सुरू करण्यात आली त्या क्षणापासून हा चित्रपट 'केवळ प्रौढांसाठीच असल्याचे आम्ही प्रत्येक वेळी सांगितले आहे. तशा आशयाची ओळही सिनेमाच्या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे. अठरा वर्षांखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी येऊ नये याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. जे यात दाखवण्यात आलेली वास्तवता पाहण्यास सक्षम आहेत. यातील दृश्यांचे गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, यातील दाहकता सहन करू शकतात अशा प्रेक्षकांनीच हा चित्रपट पहावा अशी विनंतीही आम्ही सातत्याने केली आहे. हा सिनेमा विषयाच्या दृष्टीने थोडासा जड असून सर्वसामान्य चित्रपटांसारखा नसल्याची माहितीही आम्ही देत आलो आहोत.

मुंबईत तीन दशकापूर्वी उद्धवलेली परिस्थिती आणि त्यातील दाहकता दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे केला आहे. तरीही काही गोष्टी काहींना सहन करणे किंवा बघणे चुकीचं वाटत असेल त्यांच्यासाठी ही दृश्ये • सिनेमातूनही पूर्णपणे काढण्यात आली आहेत. नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या माध्यमातून एक वास्तववादी सिनेमा आपल्या भेटीला आणला आहे. १८ वर्षावरील प्रत्येकानं सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा सिनेमा पूर्ण पाहिल्यावर आपला अभिप्राय कळवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com