श्वास रोखून धरायला लावणार हिरकणीचा ट्रेलर तुम्ही पाहिलाय का?

Hirkani
Hirkani

मुंबई : सोनाली कुलकर्णीचा लीड रोल असलेल्या हिरकणी सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असला तरी, त्याच्या ट्रेलरच अंगावर काटा आणणारा आहे. हिरकणीची शिवकालीन कथा सगळ्यांनीच शालेय पुस्तकात वाचली आहे. पण, ही स्टोरी पडद्यावर पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

सोनाली कुलकर्णी या गुणी अभिनेत्रीनं कायमच वेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न केलाय. ऐतिहासिक कथेवर आधारीत अजिंठा चित्रपटातील पारोनंतर सोनाली पुन्हा एकदा एक ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारत आहे. उत्तम गायक, उत्तम अभिनेता असलेल्या प्रसाद ओक यानं हिरकणी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमाच्या ट्रेलरवरून प्रसादनं ही ऐतिहासिक कथा उत्तम हातळल्याचं वाटत आहे. सिनेमाची पटकथा चिन्मय पाटणकरनं लिहिली आहे. संजय मेमाने याने सिनेमाचे छायाचित्रण केले असून, अमरितराज यांनी संगीत दिलंय. 

शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावर दरवाजे बंद झाल्यानंतर गडावरच अडकलेली हिरकणी धाडसानं कड्यावरून खाली उतरली होती. घरात एकट्याच असलेल्या तान्हुल्या बाळासाठी ती जीवाची बाजी लावत गड उतरली होती. कोजागिरी पोर्णिमेलाच हिरकणी गडावरून खाली उतरली होती. त्यामुळं कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्तानंच सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. ही कथा प्रसाद आणि त्याच्या टीमनं पडद्यावर साकारली आहे. पुस्तकात वाचलेली ही कथा पडद्यावर पाहणं रोमांचकारी ठरणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधील काही सीन्स हे श्वास रोखून धरायला लावणारे आहेत. त्यामुळए या सिनेमाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com