ई सकाळ Live Review उबुंटू : मुलांनी मोठ्यांची घेतलेली शाळा

टीम ई सकाळ
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

 पुष्कर श्रोत्रीने आपला पहिला सोलो दिग्दर्शन असलेला उबुंटू हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटातून शाळेचं, शालेय वयात होणाऱ्या संस्कारांचं आणि शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात आलं आहे. नेटका अभिनय, श्रवणीय संगीत, रेखीव छायांकन यामुळे हा चित्रपट एक नाॅस्टॅल्जिया देतो. या प्रामाणिक प्रयत्नाला ई सकाळच्या लाईव्ह रिव्ह्यूने दिले 3 चीअर्स.

पुणे :  पुष्कर श्रोत्रीने आपला पहिला सोलो दिग्दर्शन असलेला उबुंटू हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटातून शाळेचं, शालेय वयात होणाऱ्या संस्कारांचं आणि शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात आलं आहे. नेटका अभिनय, श्रवणीय संगीत, रेखीव छायांकन यामुळे हा चित्रपट एक नाॅस्टॅल्जिया देतो. या प्रामाणिक प्रयत्नाला ई सकाळच्या लाईव्ह रिव्ह्यूने दिले 3 चीअर्स.

उबुंटू रिव्ह्यू.. 

ई सकाळने सुरू केलेल्या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये कलाकार, दिग्दर्शकांना सहभागी होण्याची संधी असते. पण काही करणाने हे कलाकार लोक व्यग्र असल्यामुळे त्यांना या रिव्ह्यूमध्ये भाग घेता आला नाही. पुष्करने आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शकीय चुणूक दाखवली आहे. ही गोष्ट ढोबळेवाडी या गावात घडते. या गावाची शाळा टिकावी यासाठी एक शिक्षक प्रयत्न करत आहेत. सुरूवातीला दांडगी असलेली मुलं नंतर शाळेत रमतात. कारण या शिक्षकांची शिकवण्याची, समजून घेण्याची आपली अशी पद्धत आहे. त्यामुळे आता शाळेत येणारी मुलं ही शाळा चुकवत नाहीत. पण पट वाढणंही आवश्यक आहे. त्याचवेळी काही व्यक्तिगत कामानिमित्त शिक्षकांना बाहेरगावी जावं लागतं. त्यानंतर या शाळेचं काय होतं, पुढे ही शाळा नेमकी कशी वळण घेते यावर हा चित्रपट बोलतो. 

ई सकाळने या चित्रपटाला थ्री चीअर्स दिले असून, सर्व एकपडदा चित्रपटगृहांमध्ये शालेय मुलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. 

Web Title: Marathi movie Ubuntu live review soumitra pote esakal