दमदार तरुणाईचा मराठी सिनेमा ‘युवागिरी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

निर्माते राजू लक्ष्मण राठोड यांच्या प्रकाश फिल्म्सच्या ‘युवागिरी’ या सिनेमाचा टायटल लाँच समारंभ नुकताच पुण्यात झाला.

अलिकडच्या काळात पौगंडावस्थेतील मुलांना सिनेमात घेऊन त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील सगळ्यांना रूचेल, आवडेल अशी कथानके मराठी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावरून मांडली जात आहेत. तरुणाईचा सळसळता उत्साह अनेक मराठी सिनेमांमधून पाहायला मिळतो आहे. परंतु तरुणाईची मानसिकता नेमकी कशी आहे, तरुणाई नेमकी कसा विचार करते हे दाखविण्याचा प्रयत्न नव्या मराठी सिनेमातून निर्माते करणार आहेत. असाच एक नव्या दमाचा सिनेमा ‘युवागिरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Yuvagiri

सिनेमात नव्या दमाच्या तरुण, अनोख्या कलावंतांची फळी यात पाहायला मिळणार आहे. उत्तम कथानकाच्या माध्यमातून आजच्या तरुणाईची मानसिकता दाखविण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला जाणार आहे. निर्माते राजू लक्ष्मण राठोड यांच्या प्रकाश फिल्म्सच्या ‘युवागिरी’ या सिनेमाचा टायटल लाँच समारंभ नुकताच पुण्यात झाला. या टायटल लाँच कार्यक्रमाला संजय खापरे, तेजा देवकर, मीरा जगन्नाथ अंकुर क्षीरसागर, या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश जाधव तसेच सहनिर्माता जगदीश कुमावत, डीओपी  मयुरेश जोशी, कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर, कथा अंकुर क्षीरसागर, संगीत दिग्दर्शक अमोल नाईक  आदी उपस्थित होते. टायटल लाँच सोहळ्यानंतर आता ‘युवागिरी’ या नव्या मराठी सिनेमाच्या चित्रकरणाला लवकरच सुरवात केली जाणार आहे. 

Yuvagiri

Yuvagiri

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Movie Yuvagiri Is Coming Soon