शिल्पा शिंदे बिग बॉसची विजेती! 

सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - नेहमीच वादांच्या भोवऱ्यात राहिलेल्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो ची दरवर्षी चर्चा असते. 'बिग बॉस'च्या अकराव्या पर्वाचे विजेतेपद शिल्पा शिंदेने पटकावले. टीव्ही जगताची लाडकी बहु हिना खान आणि लाडकी भाभी शिल्पा शिंदे यांच्यात झालेली या पर्वातील टक्कर चांगलीच गाजली.  

मुंबई - नेहमीच वादांच्या भोवऱ्यात राहिलेल्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो ची दरवर्षी चर्चा असते. 'बिग बॉस'च्या अकराव्या पर्वाचे विजेतेपद शिल्पा शिंदेने पटकावले. टीव्ही जगताची लाडकी बहु हिना खान आणि लाडकी भाभी शिल्पा शिंदे यांच्यात झालेली या पर्वातील टक्कर चांगलीच गाजली.  

'बिग बॉस'च्या विजेतेपदावर एक-दीड हजार कोटींचा सट्टा लागल्याच्या बातम्या होत्या. हिना खान, शिल्पा शिंदे, विकास गुप्ता व मुनिश या चौघांपैकी कोण 'बिग बॉस'ची ट्रॉपी पटकावणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हिना आणि शिल्पा यांच्यामध्येच खरी टक्कर असल्याचे 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांचे मत होते. शेवटच्या दिवसांत शिल्पाने हिनावर 'चौराहेवाली आंटी' अशी कमेंट केल्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांतच नव्हे तर सोशल मीडियावरही चर्वितचर्वण झाले. हिना खान ही 'स्टार प्लस'वरील 'ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली होती; तर शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है', 'चिडीयाँ घर' या मालिकांत चमकली होती. मराठी मुलगी शिल्पा शिंदेने 'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेला निर्मात्यांसोबतच्या मतभेदामुळे बाय-बाय केले. हिना खानने गेल्या काही वर्षात टीव्ही प्रेक्षकांच्या मनात महत्त्वपुर्ण स्थान निर्माण केले होते. 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शो मध्येही तिने कमालीचा परफॉर्मन्स दिला होता.  तर शिल्पा 'भाभीजी...' सोडल्यापासून कुठेच दिसली नव्हती. त्यामुळे हिनाच्या फॅन फॉलोइंगला टक्कर देणे शिल्पासाठी सोपे नव्हते. शो मधील विकास गुप्ता याच्याशी शिल्पाचे 'बिग बॉस' घराच्या बाहेर पासूनच फारसे पटत नव्हते. मात्र 'बिग बॉस'च्या घरात विकास आणि शिल्पा यांच्यातील भावनिक चढाओढ बघायला मिळाली. त्यांच्यातील मैत्रीची चर्चा 'बिग बॉस'च्या बाहेरही झाली. 'बिग बॉस'चे अकरावे पर्व जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे ऑफिशियल टीमच्या ट्विटर अकाउंटवरुन शिल्पाने विजेतेपदाचा आनंद व्यक्त केला.

Web Title: marathi news actress shilpa shinde bigg boss winner season eleven