बॉलिवूडचे सर्व कार्यक्रम रद्द 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. चित्रीकरण आणि अन्य काही कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नेहमीच गजबजलेली ही इंडस्ट्री सुन्न झाली आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीत रोजच काही ना काही कार्यक्रम किंवा खासगी पार्ट्या असतात. एकाच दिवशी सहा किंवा सात; तसेच त्याहीपेक्षा जास्त इव्हेंट्‌स होतात. चित्रपटाचा टीझर किंवा संगीत अनावरण सोहळे असतात. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीतील उत्साहावर अवकळा पसरली आहे. यापूर्वी राजेश खन्ना आणि यश चोप्रा यांच्या निधनानंतर तीन दिवस हिंदी चित्रपटसृष्टीतील कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूड दु:खात बुडाले आहे. 

गाण्याचे चित्रीकरण रद्द 
"102 नॉट आउट' चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणाला रविवारी (ता. 25) सुरवात होणार होती. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी चित्रीकरण रद्द केले, असे सूत्रांकडून समजते.

Web Title: marathi news bollywood program canceled mumbai