विरानुष्कावर ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव!

मंगळवार, 12 डिसेंबर 2017

ट्विटरवर सध्या #virushkaKiShadi हा ट्रेंड सर्वाधिक गाजत आहे. विशेष म्हणजे विराट व अनुष्काने विवाहबद्ध झाल्याची माहिती व लग्नाचे फोटो सर्वप्रथम ट्विटरवरूनच शेअर केले.

आपल्या सर्वांची आवडती जोडी विराट-अनुष्का काल आनंदात आणि थाटामाटात लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवस गाजली, अखेरीस हे 'स्टार कपल' काल इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले व सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. या खास जोडीसाठी इटलीमधील मिलान येथे विशेष लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दोघेही पारंपारिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होते. यानंतर मुंबई व दिल्लीमध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या हितचिंतकांनी ट्विटरवरून दोघांना अनेक शुभेच्छा दिल्या. विराटचे मित्र व भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, तसेच अनुष्काच्या बॉलिवूडमधील मित्रमंडळींनी दोघांना लग्नासाठी व त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, व्हि. व्हि. एस्. लक्ष्मण, रविंद्र जडेजा, आलिया भट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

ट्विटरवर सध्या #virushkaKiShadi हा ट्रेंड सर्वाधिक गाजत आहे. विशेष म्हणजे विराट व अनुष्काने विवाहबद्ध झाल्याची माहिती व लग्नाचे फोटो सर्वप्रथम ट्विटरवरूनच शेअर केले.

Web Title: Marathi news celebrities posted good wishes to virat and anushka trough twitter