'सेक्स' चालेल.. पण 'घंटा' नको! सेन्साॅर सदस्याचे अजब तर्कट

सौमित्र पोटे
शुक्रवार, 7 जुलै 2017

सेक्स आला तर चालेल. पण घंटा नको. कारण घंटा शब्द एेकला की उगाच तसं काहीतरी वाटतं. ते फार बरं नाही. त्यामुळे सेक्स शब्द चालेल. घंटा म्य़ुट करा', असं अजब तर्कट मांडले आहे, सीबीएफसी तथा सेन्साॅर बोर्डाच्या एका महिला सदस्याने. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'कंडिशन्स अप्लाय.. अटी लागू' या सिनेमाच्या सेन्साॅरसाठीच्या स्क्रीनिंगवेळी हा प्रकार घडला आणि त्याचा फटका या सिनेमाला बसला. नायिकेच्या तोंडी असलेला घंटा हा शब्द म्युट करावा लागला. 

पुणे: 'सेक्स आला तर चालेल. पण घंटा नको. कारण घंटा शब्द एेकला की उगाच तसं काहीतरी वाटतं. ते फार बरं नाही. त्यामुळे सेक्स शब्द चालेल. घंटा म्य़ुट करा', असं अजब तर्कट मांडले आहे, सीबीएफसी तथा सेन्साॅर बोर्डाच्या एका महिला सदस्याने. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'कंडिशन्स अप्लाय.. अटी लागू' या सिनेमाच्या सेन्साॅरसाठीच्या स्क्रीनिंगवेळी हा प्रकार घडला आणि त्याचा फटका या सिनेमाला बसला. नायिकेच्या तोंडी असलेला घंटा हा शब्द म्युट करावा लागला. 

'कंडिशन्स अप्लाय' हा सिनेमा पाहताना एक बाब लक्षात येेते, ती अशी या कोणे एके काळी सेक्स या शब्दाला बॅन करणार्या सेन्साॅर बोर्डाने आता सेक्स या शब्दाला परवानगी दिली आहे. त्यामुळे कंडिशन्स अप्लाय या सिनेमात नायिका नायकाला सेक्सबद्दल मत विचारू शकली. पण त्याचवेळी नायिकेच्या तोंडी असलेल्या घंटा या शब्दाला मात्र मूग गिळून गप्प बसावं लागलं. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले, 'खरंतर घंटा या शब्दाबद्दल आक्षेप घ्यायचं काहीच कारण नव्हतं. यापूर्वी मराठीत घंटा नावाचा सिनेमा आला आहे. त्यात घंटा हा शब्द असंख्य वेळा आला आहे. तो सेन्साॅरला चालत असेल, तर आता हा आक्षेप का ते काही कळत नाही. पण सेन्साॅरसमोर कुणाचे काय चालणार. म्हणून आम्ही तो शब्द म्युट केला.'

हा सिनेमा सेन्साॅर करणार्या सदस्याला याबाबत विचारले असता, नाव न सांगण्याच्या अटीवर त्या म्हणाल्या, 'आम्हा सहापैकी पाच सदस्यांना घंटा शब्दावर आक्षेप नव्हता. या शब्दाचा मराठी सिनेमा येऊन गेल्याचे दाखले आम्ही त्यावेळी दिले. शिवाय आजच्या पिढीची तीच भाषा असल्याने खटकण्यासारखे काही नव्हते. पण, एक महिला सदस्याने यावर आक्षेप घेतला. सेक्स हा शब्द चालेल, पण घंटा हा शब्द द्वयर्थी असल्याचे दाखले त्यांनी द्यायला सुरुवात केली. आम्ही वारंवार सांगितले. पण तो सदस्या काही एेकेना. हा वाद मिटला नसता तर, सिनेमाला सेन्साॅर प्रमाणपत्र मिळायला आणखी उशीर लागला असता. त्यामुळे निर्मात्यांनीही मग म्यूट करण्याचा मार्ग स्वीकारला.'

या प्रकारामुळे सिनेसृष्टीत मात्र संभ्रमाची भावना आहे. सेन्साॅर बोर्ड नेमक्या कोणत्या गोष्टीला आक्षेप घेईल काही सांगता येत  नसल्याने हे चित्र निर्माण झाले आहे. 

Web Title: marathi news Censor Board confusion about words CBFC esakal news