मुलांच्या भावविश्वातील 'छोटी छोटी मुले!' हे नवे बालगीत 

marathi news chhoti chhoti mule new childrens song
marathi news chhoti chhoti mule new childrens song

अनिश शाम सुतार यांचे 'छोटी छोटी मुले!' पहिलेच बालगीत. त्याची बालमैत्रीण स्नेहल शिवाजी हुद्दार हिचे शब्द. शाळेतच शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थीनीने कुमारी अनुष्का अक्षय आपटे हिने हे गीत गायलेलं आहे. तिघेही बेळगाव येथील एकाच मराठी विद्यानिकेतन या शाळेचे. मराठीचे शोषण होणाऱ्या सीमाभागात या तिघा विद्यार्थ्यांनी नव्या मराठी बालगीताची निर्मिती केली आहे. 

बालगीत हा प्रकार सध्या कमी होत असतानाच खास मुलांकरिता हे गीत हा कंपू घेऊन येत आहे. प्रत्येकालाच बालपणाची आठवण करुन देणाऱ्या 'छोटी छोटी मुले!' या गीतातील चित्रीकरणात बेळगावातील 100 पेक्षा अधिक लोक सामावलेले आहेत. 'बालूज भेलपुरी हाऊस' आणि 'श्री शेट्टी स्नॅक्स' यासारख्या प्रसिद्ध खाद्य सेंटरमध्ये गीताचे चित्रीकरण झाले आहे. संयोजक प्रमोद चिल्लाळ, ध्वनिमुद्रण बेळगावातील अजिंक्य कुडतुरकर आणि छायाचित्रकार मयूर पाटील यांनी या गीतासाठी काम केले आहे. म्युझिकल ट्रॅक पुण्यात तर आवाजाचे रेकॉर्डिंग बेळगाव येथे झाले. 

योगायोगाची गोष्ट म्हणजे गीतकार याच शाळेची विद्यार्थिनी असून सध्या त्याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. संगीतकार जरी पुण्यात असले तरी या गाण्याची चाल त्याने या शाळेत असतानाच बांधली होती. तर गायिका याच शाळेत दहावीत शिकते आहे. विशेष म्हणजे गाण्याची गतीही (टेम्पो) बरोबर घड्याळाच्या सेकंद काट्याच्या गती एवढी आहे. त्यामुळे घड्याळाच्या तालाच्या ठेक्यावर वाजणारे हे गीत आहे. या बदलत्या काळात मुलांवर अतिप्रचंड ताण आहे. मुलांचे भावविश्व बदलले आहे. त्यामुळे हा ताण झुगारुन देऊन त्यांचे भावविश्व पुन्हा बालसुलभ अभिव्यक्तीने समॄद्ध व्हावे, असा या गाण्याचा आशय आहे. गाण्याच्या दरम्यान गीतकार, गायिका, छायाचित्रकार बेळगावमध्ये आणि संगीतकार, संगीत संयोजक पुण्यात असून देखीलही सोशल मिडीयाच्या वापरामुळे गाण्याच्या सरावापासून ते चित्रीकरणापर्यंत अनेक गोष्टी साध्य झाल्या. या गाण्याला केवळ 3 दिवसात 3 हजारपेक्षा जास्त बघितल्या गेले आहे. हे गाणे 'स्वरानिश' या यु ट्युब चॅनेलवर रसिकांना पाहता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com