जान्हवी कपूर 'धडक'च्या सेटवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर नुकताच 'धडक' सिनेमाच्या सेटवर परतली आहे.

जान्हवी कपूर नुकताच 'धडक' या तिच्या आगामी सिनेमाच्या सेटवर परतली आहे. आई श्रीदेवी कपूर यांच्या निधनानंतर आठवडा-दिड आठवड्याच्या कालांतराने जान्हवीने पुन्हा सिनेमाचे शूटींग सुरु केले आहे. नुकताच वयाची एकविशी गाठताना आईच्या जाण्याचे दुःखं पचवत जान्हवीने कामाबद्दल दाखविलेली तत्परता याविषयी सगळीकडे चर्चा होत आहे. तसेच इंजस्ट्रीमधूनही तिला मानसिक पाठबळ मिळत आहे. 

janhvi kapoor

ऑलिव्ह ग्रीन साडी आणि पोनीटेल हेअरस्टाईल मध्ये जान्हवी सेटवर दिसली. मराठी सिनेमा 'सैराट'ची कहानी असलेला 'धडक' हा हिंन्दी सिनेमा येत्या 20 जुलैला रिलीज होणार आहे. अभिनेता शाहिद कपूर याचा भाऊ इशान खट्टर आणि जान्हवी कपूर हे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पदार्पण करत आहेत.  

Dhadak Movie

Web Title: marathi news entertainment Janhvi Kapoor Dhadak movie set shooting bollywood