अमिताभ यांचा स्पेशल व्हॅलेंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर तरुण कलाकारांपेक्षाही जास्त ऍक्‍टीव्ह असतात. एखाद्या गोष्टीवर त्यांची प्रतिक्रिया मिळणं म्हणजे भाग्याचंच समजलं जातं. प्रत्येक सणाला किंवा खास दिवसाला अमिताभ यांनी काही पोस्ट केलं नाही, असं होतच नाही. मग प्रेमाचा दिवस "व्हॅलेंटाईन डे'सुद्धा यातून कसा सुटेल? या दिवशी बिग बींनी त्यांची व्हॅलेंटाईन जया बच्चन यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत जया बच्चन कारच्या पहिल्या सीटवर अमिताभ यांच्याकडे तोंड करून त्यांच्या बाजूला बसल्या आहेत. या पोस्टखाली अमिताभ यांनी "आठवणी अशाच काही नाजूक क्षणांतून बनतात' असं लिहिलं आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर तरुण कलाकारांपेक्षाही जास्त ऍक्‍टीव्ह असतात. एखाद्या गोष्टीवर त्यांची प्रतिक्रिया मिळणं म्हणजे भाग्याचंच समजलं जातं. प्रत्येक सणाला किंवा खास दिवसाला अमिताभ यांनी काही पोस्ट केलं नाही, असं होतच नाही. मग प्रेमाचा दिवस "व्हॅलेंटाईन डे'सुद्धा यातून कसा सुटेल? या दिवशी बिग बींनी त्यांची व्हॅलेंटाईन जया बच्चन यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत जया बच्चन कारच्या पहिल्या सीटवर अमिताभ यांच्याकडे तोंड करून त्यांच्या बाजूला बसल्या आहेत. या पोस्टखाली अमिताभ यांनी "आठवणी अशाच काही नाजूक क्षणांतून बनतात' असं लिहिलं आहे. जया बच्चन आणि अमिताभ यांच्या लग्नाला 40 पेक्षाही जास्त वर्षं झाली आहेत. तरीही त्यांच्यातील प्रेम अधिकाधिका दृढ होतंय, याची साक्ष देणारी ही अमिताभ यांची पोस्ट आहे. 

Web Title: marathi news entertainment news amitabh bacchan