पुन्हा एकदा "तेरे दर पर' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

राहुल रॉय आणि पूजा भट्ट यांच्या प्रेमाची कबुली देणारा "तेरे दर पर' हे "फिर तेरी कहानी याद आयी' या चित्रपटातील गाणं महेश भट्ट आणि कुमार सानू पुन्हा एकदा महेश भट्ट यांच्या "नामकरण' या मालिकेसाठी रिक्रिएट करणार आहेत. "नामकरण' या मालिकेतील अवनी आणि नील यांच्यातील प्रेमकथेसाठी या गाण्याचं रिक्रिएशन करण्यात येणार आहे. कुमार सानू "तेरे दर पर' हे गीत या मालिकेसाठी खास पुन्हा एकदा रेकॉर्ड करून घेणार आहेत. या गाण्यातून अवनी-नील यांची प्रेमकथा दिसणार असून गाण्याच्या चित्रीकरणात अवनी आणि नील यांचा रोमान्स बोनफायरच्या (शेकोटी) बाजूला फुलणार आहे.

राहुल रॉय आणि पूजा भट्ट यांच्या प्रेमाची कबुली देणारा "तेरे दर पर' हे "फिर तेरी कहानी याद आयी' या चित्रपटातील गाणं महेश भट्ट आणि कुमार सानू पुन्हा एकदा महेश भट्ट यांच्या "नामकरण' या मालिकेसाठी रिक्रिएट करणार आहेत. "नामकरण' या मालिकेतील अवनी आणि नील यांच्यातील प्रेमकथेसाठी या गाण्याचं रिक्रिएशन करण्यात येणार आहे. कुमार सानू "तेरे दर पर' हे गीत या मालिकेसाठी खास पुन्हा एकदा रेकॉर्ड करून घेणार आहेत. या गाण्यातून अवनी-नील यांची प्रेमकथा दिसणार असून गाण्याच्या चित्रीकरणात अवनी आणि नील यांचा रोमान्स बोनफायरच्या (शेकोटी) बाजूला फुलणार आहे. या दृश्‍यामुळे नव्वदच्या शतकातील या गाण्याच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत. या मालिकेत अवनीची भूमिका साकारणारी अदिती राठोड म्हणाली की, "आमच्या या शोसाठी कुमारजी आणि महेश सर पुन्हा एकत्र येणार आहेत, याचा मला खूप आनंद झालाय. महेश सरांच्या कामाची मी चाहती असून हे क्‍लासिक गाणं माझं खूप आवडतं आहे.' 
 

Web Title: marathi news entertainment news mahesh bhatt kumar sanu