हे बघा प्रिया वारियरचे 'फनी व्हिडीओ'!

मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

गेले दोन दिवस प्रिया वारियरच्या आदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता या व्हिडीओचे असंख्य मिम् तयार होताना दिसत आहेत.

गेले दोन दिवस प्रिया वारियरच्या आदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता या व्हिडीओचे असंख्य मिम् तयार होताना दिसत आहेत. या गाण्याचा काही भाग घेऊन 'फनी व्हिडीओ' तयार करण्यात आले आहेत. हेही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

या व्हिडीओंमध्ये ज्याला डोळा मारला आहे, त्यात बदल करून त्या ठिकाणी इतर व्यक्तिंचे चेहरे लावण्यात आले आहेत. आता ओरिजनल व्हिडीओपेक्षा हेच व्हिडीओ जास्त व्हायरल होताना दिसतात.    

'ओरु अदार लव' (Oru Adaar Love) या मल्याळम् चित्रपटातून प्रिया प्रकाश वारियर ही पदार्पण करणार आहे. त्याआधीच ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.  या गाण्यात तिने ज्या प्रकारे तिच्या प्रियकराला डोळा मारला आहे, त्या आदांवर सगळी तरूणाई फिदा झाली आहे. गाण्यातील इतरांपेक्षा प्रियाच सर्वात जास्त भाव खाऊन गेली आहे. तिच्यामुळे या गाण्याला काही तासांतच प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

 

 

Web Title: Marathi news entertainment news priya varrier memes