प्रियंका चोप्राची ब्राइडल टुडेसाठी पोझ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

ऑफ व्हाईट, क्रिम आणि ग्रीन हे तीन रंगसंगती असलेला या वधूच्या ड्रेसमध्ये प्रियंकाने आत्मविश्वासासह पोझ दिली आहे. मात्र या फोटोत वधूचा परिधान केलेला तिचा हा ड्रेस जरा ऑड संगती असलेला वाटत आहे.

केवळ अभिनेत्री म्हणूनच मर्यादित न राहता तर सामाजिक कामातही आपले योगदान देणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने 'ब्राइड्स टुडेज् मार्च 2018' या मासिकासाठी पोझ दिली. प्रियंकाचे हे शूट मासिकाच्या कव्हर फोटोसाठी घेण्यात आले. या कव्हर फोटोत तिने व्हिक्टोरीयन वधूचा वेश परिधान केला आहे. 

ऑफ व्हाईट, क्रिम आणि ग्रीन हे तीन रंगसंगती असलेला या वधूच्या ड्रेसमध्ये प्रियंकाने आत्मविश्वासासह पोझ दिली आहे. मात्र या फोटोत वधूचा परिधान केलेला तिचा हा ड्रेस जरा ऑड संगती असलेला वाटत आहे. जुन्या काळातील हॉलिवुड सिनेमातील नायिकांच्या हेअर स्टाईलप्रमाणे प्रियंकाने हेअर स्टाईल केली आहे. तसेच ग्रीन आणि क्रिम कलरच्या एंब्रॉयडरी केलेल्या जॅकेटच्या आत घातलेला ऑफ व्हाईट ब्लाउज आणि चुडीदार मॅच होताना दिसत नाहीत.

प्रियंकाने परिधान केलेल्या या वेडींग ड्रेसपैकी जॅकेट हे रोहीत बाल, ब्लाउज हे मनिष मल्होत्रा आणि चुडीदार हा अबु जानी-संदिप खोसला यांनी डिझाइन केले आहे. 

Web Title: marathi news entertainment priyanka chopra Brides Today’s March 2018 issue