'इफ्फी'त पाच मराठी चित्रपटांची निवड..

'इफ्फी'त पाच मराठी चित्रपटांची निवड..

भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. भोंगा, 'तुझ्या आयला', 'आनंदी गोपाळ', 'माई घाट : क्राइम नंबर १०३|२००' आणि 'फोटो प्रेम' हे सिनेमा यंदा गोव्यातील इफ्फी फेस्ट मध्ये दाखवले जाणारेत.

दोन वर्षांपूर्वीच्या महोत्सवात नऊ, तर गेल्या वर्षी दोन मराठी चित्रपट 'इफ्फी'मध्ये निवडण्यात आले होते. या विभागात मल्याळम्, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांतील चित्रपटांचा वरचष्मा यंदाही कायम आहे.

मुख्यत्वे भारतातील पॅरॅललसिनेमांचा आवाका जगभरात पोहोचवण्याच्या उद्धेशाने 'इंडियन पॅनोरमा' हा विभाग ओळखला जातो. दम्यान २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात ५० वा 'इफ्फी' सोहळा पार पडणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com