कपिल शर्मा पुन्हा येतोय..! 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई : छोट्या पडद्यावरचा विनोदवीर कपिल शर्मा येत्या काही दिवसांतच पुन्हा एकदा टीव्हीवर त्याचा नवा कार्यक्रम घेऊन हजर होणार आहे. गेल्या वर्षभरापासून विविध वादांच्या केंद्रस्थानी असलेल्या कपिल शर्माने त्याचा 'कॉमेडी नाईट्‌स विथ कपिल' हा गाजलेला कार्यक्रमही बंद केला होता. 

कपिल शर्माच्या आगामी कार्यक्रमाची एक खास झलक तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. कपिलचा हा कार्यक्रम येत्या मार्चमध्ये प्रेक्षकांसमोर येईल. अर्थात, कपिल शर्मा पुन्हा एकदा विनोदाच्याच मार्गावर जाणार असला, तरीही त्याचा साथीदार सुनील ग्रोव्हर या कार्यक्रमात नसेल. या कार्यक्रमाचे स्वरूप आणि नाव अद्याप निश्‍चित व्हायचे आहे. 

गेल्या वर्षी कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सुनीलने तर 'कॉमेडी नाईट्‌स..' हा कार्यक्रम सोडलाच; शिवाय अन्य काही कलाकारांनीही या कार्यक्रमातून माघार घेतली होती. यामुळे कार्यक्रमाचा 'टीआरपी' कमालीचा घसरला होता. शिवाय याच दरम्यान कपिलची तब्येतही वारंवार खराब होत असल्याने 'कलर्स' वाहिनीने या कार्यक्रमास तात्पुरती विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: marathi news Kapil Sharma Comedy Nights with Kapil Entertainment