माधुरीची दिमाखात बाईक रायडिंग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

'बकेट लिस्ट' या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी माधुरी बरीच मेहनत घेत असून माधुरीने नुकताच बाईक रायडिंगचाही अनुभव घेतला. 

माधुरी दिक्षित हे नाव घेतलं की अनेकांची धकधक वाढते. बॉलिवूडमध्ये तर माधुरीने अनेक चित्रपट गाजवले. आता मराठी चित्रपटातही लवकरच धकधक गर्ल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'बकेट लिस्ट' या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी माधुरी बरीच मेहनत घेत असून तीने नुकताच बाईक रायडिंगचाही अनुभव घेतला. 
Madhuri Dixit'बकेट लिस्ट' चित्रपटाची संपूर्ण टीम काही दिवसांपूर्वीच पुण्यात आली होती. अलिबाग आणि मुंबई येथील चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर माधुरी आणि संपूर्ण टीमने बाईक रायडिंगचे  चित्रीकरण केले. यावेळी टीमला काही अडचणींचा सामना करावा लागला. पण तरी उत्स्फुर्तपणे माधुरी आणि टीमने चित्रीकरण पुर्ण केले. काळ्या रंगाचे जॅकेट, स्पोर्टस् हेल्मेट आणि ब्लॅक बुटस् घालून एखाद्या प्रोफेशनल बाईक रायडर प्रमाणे माधुरी दिमाखात रायडिंग करताना दिसली. ‘दार मोशन पिक्चर्स’, ‘डार्क हॉर्स सिनेमाज्’ आणि ‘ब्लू मस्टँग क्रिएशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रेणुका शहाणे आणि माधुरी तब्बल २३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.
Madhuri Dixit

Web Title: marathi news madhuri dikshit bike riding marathi movie bucket list