विराट-अनुष्काचे लग्न...पुन्हा एकदा अफवेपुरतेच...!

वृत्तसंस्था
बुधवार, 6 डिसेंबर 2017

येत्या आठवड्यात ते दोघे लग्न करणार असल्याची माहिती ट्विटरवरील एका ट्विटच्या हवाल्याने दुपारी पसरली. विराट-अनुष्का लग्नाच्या बंधनात कधी अडकणार याबाबतची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले, अशा आशयाच्या चर्चा सोशल मीडियावर दुपारनंतर झडू लागल्या.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची आज दुपारपासून प्रसिद्ध होत असलेली माहिती म्हणजे नवी अफवा असल्याचे रात्री स्पष्ट झाले. अनुष्काच्या प्रवक्त्याने तसा खुलासा पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.  

येत्या आठवड्यात ते दोघे लग्न करणार असल्याची माहिती ट्विटरवरील एका ट्विटच्या हवाल्याने दुपारी पसरली. विराट-अनुष्का लग्नाच्या बंधनात कधी अडकणार याबाबतची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले, अशा आशयाच्या चर्चा सोशल मीडियावर दुपारनंतर झडू लागल्या. 

विराट-अनुष्का हे दोघे 9 ते 12 डिसेंबरदरम्यान इटलीमध्ये विवाह बंधनात अडकणार, अशी माहितीही ट्विटरवर आली. मात्र, या दोघांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नव्हती.

Web Title: marathi news national entertainment virat kohli anushka sharma wedding