'न्यूड'चा मार्ग अखेर मोकळा

गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आलेला 'न्यूड' या सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गातील अडचण संपली आहे. या सिनेमाला अखेर सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

मराठीतील हिट दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'न्यूड' सिनेमामागची सेन्सॉर बोर्डाची अडचण संपली आहे. एवढेच नव्हे तर या सिनेमातील कोणतेही दृष्य न कापता ए प्रमाणपत्र दिले गेले आहे. त्यामुळे 'न्यूड' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आले होते. तेरा ज्युरी मेंबर्सनी एकुण 24 सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनोरमा विभागात न्यूड सिनेमाचे स्क्रिनिंग होणार होते. मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला वगळण्यात आले. सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत या सिनेमाला यादीतून वगळण्यात आले होते. हा सिनेमा न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका तरुण स्त्रीच्या जीवनावर आधारीत आहे. सिनेमाला वगळल्यानंतर रवी जाधव यांनी निराशा व्यक्त केली होती. 'न्यूड' सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वादावरुन सेन्सॉर बोर्ड आणि सरकारवर जोरदार टीका झाली होती. 

Web Title: marathi news nude marathi movie censor board permission