सेलिब्रिटीजचे पॅडमॅन चॅलेंन्ज दणक्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सेलिब्रिटीज् आपापल्या सोशल मिडिया अकाउंटवरुन सॅनिटरी नॅपकीन सोबतचे फोटोज् आवर्जून अपलोड करत आहेत. 

पॅडमॅन हा बहुचर्चित सिनेमा त्याच्या विषयामुळे गाजत आहे. समाजातील काही संवेदनशील असलेल्या मासिक पाळी या विषयावर सिनेमाचे कथानक भाष्य करते. पद्मावत नंतर यावर्षातील सगळ्यात जास्त चर्चिला गेलेला हा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सिनेमाचे प्रमोशन करण्याचा एक सकारात्मक फंडा सिनेमाचा हिरो अक्षय कुमार याने शोधून काढला आहे. त्याने एक आव्हान सगळ्यांना दिले आहे. या त्याच्या आव्हानाला बॉलीवूडमधून चांगला प्रतिसाद येत आहे. सेलिब्रिटीज् आपापल्या सोशल मिडिया अकाउंटवरुन सॅनिटरी नॅपकीन सोबतचे फोटोज् आवर्जून अपलोड करत आहेत. 

पद्मावत स्टार दिपिका पदुकोण आणि धकधक गर्ल माधुरी दिक्षित यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर बुमरॅन्ग व्हिडीओ अपलोड करत हे आव्हान स्विकारले आहे. तर मिस्टर इंडिया अनिल कपुर आणि न्युटन राजकुमार राव यांनी एका अॅड द्वारे ट्विटर वरुन फोटो विथ सॅनिटरी नॅपकीन चॅलेंन्ज पुर्ण केले आहे. तर ओप्रा विन्फ्रे, माधुरी दिक्षित आणि प्रियंका चोप्रा यांना त्यांनी या पोस्टमध्ये हे आव्हान दिले आहे. याशिवाय अर्जुन कपूर, स्वरा भास्कर, सोनम कपूर, राधिका आपटे, अदिती राव हैदरी, आमिर खान, आयुष्यमान खुराना, आलिया भट, शबाना आझमी, दिया मिर्झा, सोफिया चौधरी, हुमा कुरेशी यांनी हे आव्हान स्विकारले आहे. याशिवाय अक्षय कुमार ज्यांची भूमिका साकारतोय असे रियल पॅडमॅन तमिळनाडूचे अरुणाचलम मुरुगनाथम यांनीही काही दिवसांपूर्वी सॅनिटरी नॅपकीन सोबत आपला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. 

 

Padman challenge Alia Bhatt

Padman challenge Arjun kapoor 
Padman challenge Radhika Aapte

Padman challenge Sonam Kapoor

Padman challenge Swara Bhaskar

Padman challenge Aditi Rao Haidari

Padman challenge Huma Qureshi

Padman challenge Sophie Chaudhary

Padman challenge Ayushmann Khurana

Padman challenge Shabana Azmi

Web Title: marathi news padman movie challenge celebrities akshay kumar