भावना दुखावण्याची भन्साळींची खोड जुनीच : योगी आदित्यनाथ

Marathi news Padmavati movie controversy Yogi Adityanath
Marathi news Padmavati movie controversy Yogi Adityanath

गोरखपूर : "पद्मावती चित्रपटातील कलाकारांना धमकी देणारे जितके दोषी आहेत, तितकेच दोषी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळीदेखील आहेत,'' अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केली. 

ते म्हणाले, "लोकांच्या भावनांशी खेळ करण्याची भन्साळी यांची खोड जुनी आहे. या प्रकरणी कारवाई झाली तर ती दोन्ही बाजूंवर व्हायला हवी. चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळल्याशिवाय उत्तर प्रदेशात सिनेमा प्रदर्शित करू देणार नाही.'' 

ते म्हणाले, "कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणाला अधिकार नाही. कलाकारांना धमकी देणारे आणि भन्साळी दोघेही दोषी आहेत. प्रत्येकांनी परस्परांच्या भावनांचा आदर केलाच पाहिजे.'' 
उत्तर प्रदेश सरकारने 15 नोव्हेंबरला केंद्र सरकारला पत्र पाठविले असून, एक डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या हिताचे नसल्याचे त्यात म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशप्रमाणेच भाजपशासित राजस्थान व मध्य प्रदेशच्या सरकारनेही या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शविला आहे. तर देशाच्या विविध भागांत सध्या या चित्रपटाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. 

'मी दोनशे टक्के पद्मावती चित्रपटासोबत आहे,' असे चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका वठविणारा बॉलीवूड स्टार रणवीर कपूर याने म्हटले आहे. चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणाऱया दीपिका पदुकोन हीने चित्रपटाला होणारा विरोध म्हणजे गळचेपी असल्याची टीका केली होती. 

'पद्मावती'चा 'खेळ'

  • करणी सेना नावाच्या राजपूत संघटनेने सर्वप्रथम पद्मावती चित्रपटाला विरोध केला. जानेवारीत जयपूरमध्ये चित्रपट दिग्दर्शकांवर सेनेने हल्ला केला. 
  • राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये चित्रपटाला सर्वाधिक विरोध होत आहे. त्यानंतर पंजाबमध्येही चित्रपटाला विरोध सुरू झाला. 
  • सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले, तरीही हा चित्रपट आपल्या राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केले आहे. 
  • चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी सादर केलेला अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळला गेला आहे. 
  • सध्याची परिस्थिती पाहता, हा चित्रपट नव्या वर्षात प्रदर्शित होईल. त्या आधी 21 डिसेंबरला सलमान खानचा 'टायगर जिंदा है' प्रदर्शित होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com