'मेन डोन्ट क्राय' 

अभिजित रणदिवे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

16व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आज (ता. 11) सुरवात होत आहे. बोस्नियाच्या 'मेन डोन्ट क्राय' या चित्रपटाला महोत्सवाच्या 'ओपनिंग फिल्म'चा मान मिळाला आहे. दिग्दर्शक ऍलन ड्रलयेविच यांच्या या चित्रपटाने यंदाच्या हॅम्बर्ग व झाग्रेब चित्रपट महोत्सवात जाणकारांची भरपूर प्रशंसा मिळवली. ऑस्करच्या 'परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटा'साठीच्या स्पर्धेतही या वर्षी हा चित्रपट होता. त्याविषयी येथे लिहिले आहे, चित्रपटतज्ज्ञ व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे क्रिएटिव्ह हेड अभिजित रणदिवे यांनी... 

'मेन डोन्ट क्राय' या चित्रपटाला बॉस्नियन यादवी युद्धाची पार्श्वभूमी आहे. युद्ध संपून आता वीस वर्षे उलटून गेली आहेत; पण युद्धात लढलेल्या अनेक सैनिकांच्या मनातले त्याचे घाव खोलवर गेलेले आहेत. विरोधी बाजूबद्दलचा विखारही अद्याप शमलेला नाही. दोन धर्मांच्या लोकांमध्ये निर्माण झालेली तेढ युद्धामागचे प्रमुख कारण होते. त्यामुळे परस्परांच्या धर्माविषयी संशय किंवा द्वेष सैनिकांच्या मनात अजून जिवंत आहे. दोन्ही बाजूंच्या काही सैनिकांना पुन्हा एकत्र आणले गेले आहे. त्यांच्यातील दरी सांधण्याचा आणि त्यांची मने मोकळी करण्याचा एक प्रयत्न म्हणून 'थिएटर थेरपी' आणि खेळ यांसारख्या काही मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर केला जातो आहे. परंतु, खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी वर्षानुवर्षे साचलेला विद्वेष सहजासहजी कमी होणार नसतो. त्यासाठी आलेल्या प्रत्येक सैनिकाला अग्निदिव्यातून जावे लागणार असते. सर्व माणसे आतून एकमेकांसारखीच असतात याची जाणीव आणि परस्परांविषयी स्नेह उत्पन्न करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न यशस्वी होतो का?... 

आपल्याहून वेगळ्या माणसाविषयी संशय, विद्वेष आणि हिंसावेग आज जगभरात अनेक ठिकाणी संघर्षाला रसद पुरवत आहे. युद्धाच्या अघोरी परिणामांबद्दलची अनभिज्ञता त्याला आणखी बळ देते आहे. अशा काळातही माणुसकी कशी जिवंत राहू शकते, याचे मनस्पर्शी चित्रण 'मेन डोन्ट क्राय' करतो. म्हणूनच तो अंतिमतः दुर्दम्य आशावादाचे समर्थन करतो.

Web Title: marathi news Pune News PIFF 2018 Men Dont Cry abhijeet ranadive