रणवीर सिंग लवकरच कपील देव यांच्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पद्मावतमधील खिलजीनंतर अभिनेता रणवीर सिंग आता कपिल देव यांची भूमिका '83' मध्ये साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे.

चित्रपट निर्माते कबीर खान यांनी 30 ऑगस्ट 2019 ही तारीख कपील देव यांची बायोपिक असलेला चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे घोषित केले आहे. '83' असे या चित्रपटाचे नाव तुर्तास तरी ठरविण्यात आले आहे. 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदा विश्वचषक मिळवला होता. म्हणून या चित्रपटाला '83' असे नाव दिले आहे. पद्मावतमधील खिलजीनंतर अभिनेता रणवीर सिंग आता कपिल देव यांची भूमिका '83' मध्ये साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हा चित्रपट फॅन्टम फिल्मस् कडून निर्मित केला जाणार आहे. फॅन्टम फिल्मस् चे सहसंस्थापक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधु मनतेना हे सह-संस्थापक आहेत. तर कबीर खान हे दिग्दर्शन करतील. 

1983 सालीचा भारतीय क्रिकेट संघ कबीर खान आणि रणवीर सिंग यांना चित्रपटासाठी ट्रेनिंग देणार असल्याचे कळते. 'रणवीर सिंग हा भूमिकेला गरजेच्या असलेल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी योग्य आहे. तो कोणतीही भूमिका बजावताना ती ताकदीने सादर करतो', असे कबीर खान यांनी म्हटले आहे. रणवीर सध्या झोया अख्तर दिग्दर्शित 'गुल्ली बॉय' या चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. तसेच रोहीत शेट्टी सोबत 'सिम्बा' नावाच्या प्रोजेक्टवरही रणवीरचे काम सुरु आहे. 

Web Title: marathi news ranveer singh kapil dev biopic