रोशेल रावचा सिंपल-सेक्सी वेडींग लूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

रोशेलने लाँन्ग व्हाईट फ्लोरल प्रिंट गाउन तर केथने आइस ब्लु सुट असा पेहराव केला होता.

बिग बॉस 9 ची स्पर्धक रोशेल राव सध्या चर्चेत आहे ती आपल्या वेडींग आउटफिटने. रोशेल आणि टि. व्ही. स्टार केथ सेक्वेरा हे नुकतेच लग्नबंधनात अडकलेत. या लग्नासह याप्रसंगी परिधान केलेले दोघांचेही आउटफिट सध्या चर्चेत आहे. रोशेलने लाँन्ग व्हाईट फ्लोरल प्रिंट गाउन तर केथने आइस ब्लु सुट असा पेहराव केला होता. गेल्या रविवारी तामिलनाडूतील महाबालीपुरम येथील बीचवर हा लग्नंसोहळा ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. डायमंड ज्वेलरी ने सजलेली ही नवरी सिंपल पण सेक्सी लूक मध्ये दिसली. 

rochelle rao

रोशेलच्या केवळ आउटफिटनेच नव्हे तर मेक-अपनेही लक्षं वेधले. ग्लॉसी पिंक लिप, ब्लश, स्मोकी आय आणि बोल्ड लॅशेस असा क्लासी मेक-अप व्हाईट गाउनला शोभून दिसत होता.  

 

Web Title: marathi news rochelle rao Keith Sequeira wedding outfit actor tv drama

टॅग्स