सलमान खानने रोवली 'बोनस' सिनेमाची मुहूर्तमेढ

मंगळवार, 30 जानेवारी 2018

'बोनस'… सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. बॉलिवूडचा टायगर सलमान खानने लायन क्राऊन एंटरटेन्मेंट निर्मित 'बोनस' या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त संपन्न केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत लायन क्राऊन एंटरटेनमेंटचे गोविंद उभे, रतिश पाटील, संदेश पाटील आणि एम. नितीन उपस्थित होते.

आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बोनस देऊ करणारे लायन क्राऊन एंटरटेन्मेंटचे निर्माते या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, 'बोनस' हा शब्द आनंद आणि उत्साहाशी निगडीत आहे. आमच्या या चित्रपटाच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र 'बोनस'चा आनंद आणि उत्साह साजरा करु शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बोनस हा सिनेमा माणूसकीवर आधारित असून आयुष्यातील महत्त्वपूर्ण पैलूवर भाष्य करतो आणि सोबतच हा सिनेमा एक मजेशीर सफरही करुन देईल. मराठी सिनेसृष्टीत 'बोनस' हा लायन क्राऊन एंटरटेन्मेंटचा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी हिंदी चित्रपट आणि अनेक हिंदी आणि मराठी मालिकांची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा सौरभ भावे यांनी लिहिली असून या चित्रपटाचे छायाचित्र दिग्दर्शन संजय मेमाणे करणार आहेत. तर या चित्रपटाला संगीताचा साज रोहन-रोहन या तरुण संगीतकार जोडीने चढवला आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला 'बोनस' मिळणार आहे.

मनोरंजन संबंधित बातम्या -

Web Title: marathi news salman khan marathi movie bonus inauguration