गुगलची व्ही. शांताराम यांना जयंतीनिमीत्त अनोखी मानवंदना

शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

व्ही. शांताराम हे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते
होते, याचेच अनोखे स्वरूप गुगलच्या डूडलमध्ये दिसून येते.

पुणे : व्ही. शांताराम यांच्या 116व्या जयंतीनिमीत्त गुगलने उत्तम डूडल तयार करून शांताराम यांना अभिवादन केले आहे. व्ही. शांताराम हे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते
होते, याचेच अनोखे स्वरूप गुगलच्या डूडलमध्ये दिसून येते. गुगल नेहमीच अशा प्रकारचे आकर्षक डूडल तयार करून मान्यवरांना श्रद्धांजली वहात असते.
     
शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान दिले आहे. त्यांना बापू या नावाने संबोधत. चित्रपट तंत्रज्ञानातील
नवनवीन संकल्पना मराठीत वापरण्यावर त्यांचा भर होता. व्ही. शांताराम यांना आचार्य अत्रे यांनी 'चित्रपती' ही पदवी दिली होती. 

'पिंजरा', 'दो आँखे बारह हाथ', 'नवरंग', 'डॉ. कोटणीस की अमर कहानी' यांसारख्या अजरामर कलाकृती व्ही. शांताराम यांनी सिनेसृष्टीला दिल्या. त्यांना 1985 साली चित्रपट
क्षेत्रातील सर्वोच्च् 'दादासाहेब फाळके पुरस्काराने' गौरविण्यात आले.      

Web Title: Marathi news Special Google doodle on V. Shantaram's birth anniversary