निकिताचा छोट्या पडद्यावरील बिकीनी लुक चर्चेत

मंगळवार, 16 जानेवारी 2018

अभिनेत्री आणि मिस इंडिया 2012 च्या अंतिम फेरीत निकिता दत्ताने मजल मारली होती. 'हासिल' या तिच्या येत्या टीव्ही शो सोबतच अक्षय कुमार स्टारर 'गोल्ड' या आगामी चित्रपटातही ती झळकणार आहे. विशेष म्हणजे टीव्हीवरील महिला कलाकारांना भारतीय पोशाखांपुरतेच मर्यादित केले जाते. पण निकिताने अलिकडेच आपला बिकिनी लुक प्रेक्षकांना दाखविला आहे. 'झूम' या टीव्ही चॅनेलवर अँकर म्हणून लोकप्रियता मिळवलेली निकीता तिच्या एका संगीत व्हिडिओ शॉटसाठी बिकिनीत दिसली. 

तिला टीव्हीवर या तिच्या बोल्ड लुकबद्दल विचारले असता तिने उत्तर दिले, "टीव्ही आणि चित्रपट यांमध्ये मी कधीही फरक केलेला नाही. आत्मविश्वासाचा हा सगळा खेळ आहे आणि त्या सीनची गरज असेल तर मला लहान स्क्रीनवर बिकिनी घालण्यात काही गैर वाटत नाही." 

प्रत्येक वेळी एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला आपली टोन्ड बॉडी पडद्यावर दाखवावी लागते, म्हणून ते फार मोजून मापून आहार (डाएट) घेतात. "मी नेहमीच डाएटच्या विरोधात आहे. मी नेहमीच माझ्या फिटनेसला प्राधान्य दिले आहे आणि नेहमीच बिकिनी परिधान करण्यासाठी शरीराचा जसा आकार लागतो यासाठी तयार राहणे केव्हाही चांगलेच आहे." असेही निकीता म्हणाली. 

Web Title: marathi news tv actor nikita dutta bikini look for music video