हर कदम आपकी जरूरत है...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

आपके आने से जिंदगी कितनी खूबसूरत है 
दिले में बसी है जो वो आपकी सूरत है 
दूर जाना नहीं हमसे कभी भूलकर भी 
हमे हर कदम आपकी जरूरत है 

म्हणत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरे, "रेगे' या चित्रपटातील अभिनेता आरोह वेलणकर, "होणार सून मी या घरची' यातील लोकप्रिय भूमिका करणारा पिंट्या म्हणजेच रोहन गुजर हे कलाकार नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. हे कलाकार लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन कसा साजरा करणार आहेत, याविषयी "सकाळ'शी साधलेला संवाद. 

आपके आने से जिंदगी कितनी खूबसूरत है 
दिले में बसी है जो वो आपकी सूरत है 
दूर जाना नहीं हमसे कभी भूलकर भी 
हमे हर कदम आपकी जरूरत है 

म्हणत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरे, "रेगे' या चित्रपटातील अभिनेता आरोह वेलणकर, "होणार सून मी या घरची' यातील लोकप्रिय भूमिका करणारा पिंट्या म्हणजेच रोहन गुजर हे कलाकार नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. हे कलाकार लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन कसा साजरा करणार आहेत, याविषयी "सकाळ'शी साधलेला संवाद. 

समजूतदारपणाच महत्त्वाचा 
प्रार्थना बेहरे - माझे लग्न होऊन दोन ते तीन महिने झालेत. लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेनटाइन डे असल्यामुळे दोघेही तो साजरा करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. प्रेमाचा हा महत्त्वपूर्ण दिवस साजरा करण्यासाठी दोघांजवळही वेळ नाही, तोही दिग्दर्शक असल्यामुळे खूप व्यग्र, तर मीही चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये आहे. मात्र दोघेही या व्यग्र शेड्यूल्डमधून वेळ काढून हा दिवस साजरा करणार आहोत. मला वाटते, लग्न यशस्वी होण्यासाठी दोघांमध्ये समजूतदारपणा, प्रेम या दोन गोष्टी पुरे असतात. त्यावर लव्ह कि अरेंज मॅरेज यांचा काहीही फरक पडत नाही. आयुष्याच्या या धावत्या युगात प्रत्येक व्यक्ती हा व्यग्र झाली आहे. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी असे हे वेगवेगळे दिवस खूप महत्त्वपूर्ण ठरतात. 

सरप्राइज पार्टी देणार 
आरोह वेलणकर - मी डिसेंबर महिन्यात अंकिता सिंघवीसोबत विवाहबंधनात अडकलो आहे. आमची पहिली भेट एमआयटी कॉलेज येथे झाली होती. म्हणतात ना, प्रेमात पडताना जात, धर्म पाहिले जात नाही. नेमकी दोघांच्या बाबतीतही तेच घडले. ती मारवाडी असली तरी माझ्या परिवाराने कोणताही विरोध केला नाही. आठ ते नऊ वर्षे रिलेशनमध्ये असल्यामुळे व्हॅलेंनटाइन डेचं एवढं कौतुक वाटत नाही. मात्र या खास दिवसानिमित्ताने मी अंकिताला एक प्रॉमिस देणार आहे - ते म्हणजे, शूटिंगच्या निमित्ताने सतत बाहेर राहावे लागत असते. त्यामुळे तिला वेळच देता येत नाही. म्हणून तिला भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच रात्री लवकर घरी पोचून तिला सरप्राईज पार्टी देणार आहे. सोबत कॅंडल नाइट डिनरचा प्लॅनदेखील आहे. 

छोटी कृती, मोठा अर्थ 
रोहन गुजर - या दिवशी चॉकलेट, गुलाबाचे फुल, ग्रीटिंग कार्ड देण्यापेक्षा आपल्या व्हॅलेनटाइनला काय हवं आहे, या गोष्टीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. तिच्या इच्छा, आकांक्षा, आरोग्य या सर्व गोष्टींची आवर्जुन चौकशी केली पाहिजे. आपल्या या छोट्या विचारण्यानेदेखील आपला व्हॅलेनटाइन नेहमीच आनंदी राहू शकतो. हल्ली नवरा बायको हे दोघेही कामावर असतात. त्यामुळे दोघांनाही एकमेकांविषयी आपुलकीने संवाद करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे व्हॅलेनटाइन, फ्रेंडशीप डे असे विविध डे नाते फुलविण्यासाठी महत्वाचे ठरतात. मी व्हॅलेंटाइनला शूटिंगच्या निमित्ताने बाहेर असणार आहे. त्यामुळे स्नेहलला वेळ देणं खूप मुश्‍किल आहे. मात्र शूटिंग संपल्यानंतर तिला काहीतरी भन्नाट सरप्राइज देण्याचा विचार नक्की करणार.

प्रेमात आणि युद्धात सगळे माफ 
अमेय वाघ - यंदा व्हॅलेंटाइन डे माझ्यासाठी विशेष आहे. कामाच्या व्यग्रतेतून वेळ काढून तो साजरा करण्यासाठी साजिरीसोबत आजोळी आलो आहे. हिरवळ, शांतता आणि निसर्गसौंदर्यात तो साजरा करणार आहे. तिला भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या लग्नाला सात-आठ महिने झाले; पण कलाकार असल्याने कामांची घाई आणि व्यग्रतेने घरी फारसा वेळ देणे शक्‍य नसते. पण प्रेमात आणि युद्धात सगळे काही माफ असते म्हणून तिही मला समजून घेते, माफ करते.

Web Title: marathi news valentine's day celebration