व्हॅलेंटाईन डे स्पेशल; अभिनेता शशांक केतकर आपल्या प्रेमाबद्दल भरभरुन सांगतोय...

बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

काही नाती आपल्या आयुष्यात आपोआपच घडत जातात आणि आपल्याला घडवत जातात. माझं प्रियंकाशी असलेलं नातं तसं आहे....

आपल्या प्रेमाविषयी कौतुकाने शेअर करणारा अभिनेता शशांक केतकर याने खास व्हॅलेंटाईन डेनिमित्त ई सकाळशी संवाद साधला. आयुष्यात प्रेमाला खुप प्रॅक्टीकली आणि लॉजिकली बघणाऱ्या अभिनेता शशांक केतकर आणि प्रियंका ढवळे या जोडीविषयी जाणून घेऊया... 

प्रियंका आणि मी खुप प्रॅक्टीकल आहोत. आम्हाला मुळात व्हॅलेंटाईन डे ही संकल्पना आपल्याकडे ज्या पद्धतीने आहे ते बालिश वाटतं. कधी कधी ते विनोदीही वाटतं. कारण त्या दिवशीच म्हणून प्रेम किती हे का दाखवावं. आपण जर आयुष्यभरच प्रेम करत राहीलो. सगळ्यांशीच तर प्रेमाने राहीलो. तर व्हॅलेंटाईन डे आपण रोजच साजरा करु शकू. शेवटी प्रेम म्हणजे एक मुलगा आणि मुलगी एवढच नसतं ना. प्रेम करायला अनेक नाती आहेत..निसर्ग आहे... हे मी आणि प्रियंका दोघांनाही वाटतं. यावर्षी मी एक छोटसं सरप्राईज् प्रियंकासाठी ठेवलं आहे. लोणावळ्याला आम्ही व्हॅलेंटाईन डे एन्जॉय करणार आहोत. 

प्रियंकाशी पहिली भेट फेसबुकवर झाली. चार वर्ष आम्ही फेसबुक फ्रेंडच होतो. ती उत्तम नृत्य करते. त्याचे व्हिडिओज् फेसबुकवर मी बघितले होते. आणि एखाद्यावेळी फेसबुकवरच बोलणं व्हायचं. ती एकदा 'गोष्टं तशी गंमतीची' नाटकाला आली होती. तेव्हापासून खरं तर आमच्यात प्रेमाची फुंकर पडली. काही लोक एका क्षणात अपील होतात तशी प्रियंका मला आवडली. खुप सकारात्मकता तिच्या वागण्या-बोलण्यातून सुरवातीपासूनच मला जाणवत आली आहे. 

Shashank ketkar

तिच्यात असलेले दुर्मिळ गुण मला नेहमीच भावले आहे. समोरसमोर स्पष्टं बोलणे, आपल्या आजूबाजुच्या गोष्टींबाबत सतत अपडेट राहणे आणि नात्यांना केवळ भावनिकतेच्याच पारड्यात न ठेवता लॉजिकली निर्णय घेणे या तिच्या स्वभावाचं मला फार कौतुक वाटतं. आमच्या दोघातलं नातंही असंच आहे. मुळात मला आणि तिला कामांमध्ये गुंतायला आवडतं. आम्हाला वर्कहोलिक म्हटलं तरी चालेल. कसं होतं ना की, काही नाती आपल्या आयुष्यात आपोआपच घडत जातात आणि आपल्याला घडवत जातात. माझं प्रियंकाशी असलेलं नातं तसं आहे. 

Shashank ketkar

मित्रांमध्ये रमणारी तितकीच घराची ओढ असलेली, छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक असणारी माझी बायको मला नेहमी प्रेमात पाडते. त्यामुळे आमचा वर्षभर व्हॅलेंटाईन डे असतो असं म्हटलं तरी चालेल. सतत खुश राहणं, हसत राहणं..तिच्या मते हेच प्रेम आहे. आणि माझ्या मते विचाराल तर काही वेगळं नाही. एकमेकांना सोबत देत राहणं आणि सोबत आहे त्या प्रत्येकाशी प्रेमानी वागत राहणं याशिवाय प्रेम अजून काय असेल...  

Valentine's Day स्पेशल :

Web Title: marathi news valentines day special actor shashank ketkar love story