Bigg Boss Marathi 4: सिद्धूची घरात एंट्री! कोणाला घराबाहेर घेऊन जाणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: सिद्धूची घरात एंट्री! कोणाला घराबाहेर घेऊन जाणार?

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात चार वाइल्ड कार्ड एंट्री झाल्यापासून घरात रोजचं नवीन राडा पाहायला मिळत आहेत. त्यातच ते चारही आल्यापासून बिग बॉसनी सुट्टी घेतली आहे. त्यामुळे घराची जबाबदारी हे चार धुरंदर चांगल्याप्रकारे पार पाडत आहे. आता त्यातच घरातील स्पर्धक रोहित शिंदे आणि मीरा जगन्नाथ यांच्यातही वाद झाला आहे.

दरम्यान आता बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ जाधव येणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या त्याच्या आगामी ‘बालभारती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने बिगबॉसच्या घरात एंट्री केली आहे. त्याला घरात पहाताच, सर्व स्पर्धक खुप आंनदी होतात. आता आपण मजा करुयात असं तो म्हणतो आणि थोड्या वेळातच शाब्दिक बॉम्ब फोडतो. मी घरातुन बाहेर जातांना एका सदस्यला घरातुन घेऊन जाइलं असं म्हणतो. हे एकताच स्पर्धकांचे चेहरेचं पडतात. त्यामूळे घरातुन कोणाची तरी एक्झिट होणार आहे. आता कोण जाणार हे लवकरचं कळेलं..

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

गेल्या आठवड्यात अचानक अभिनेत्री टेजस्विनी लोणारीला घराबाहेर जावे लागले. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घर सोडून जाणे अपिरहार्य आहे असे बिग बॉसने तीला संगितले. तेजस्विनीला गंभीर इजा झाल्याने नाईलाजाने हा निर्णय तिला मान्य करावा लागला.त्यामुळे आता पुन्हा सिद्धार्थ जर कोणी स्पर्धक गेला तर घरात दोन एलिमेशन होइलं.

सिद्धार्थच्या बालभारती चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर यात नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, आर्यन मेंघजी, उषा नाईक, रविंद्र मंकणी, संजय मोने यांच्याही महत्वाच्या भुमिका आहेत.