सुमी आणि समर करत आहेत सेलिब्रेशन, कारण आहे खास !

वृत्तसंस्था
Monday, 10 February 2020

सर्व जुन्या मालिकांना टक्कर देणारी नवी मालिका म्हणजे 'मिसेस मुख्यमंत्री'. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली आहे. 

मुंबई : झी मराठी चॅनलवरील मालिका या सतत टिआरपीच्या स्पर्धेत असतात. या चॅनलवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. त्यातील चला हवा येऊ द्या, माझ्या नवऱ्याची बायको, स्वराज्यरक्षक संभाजी, तुझ्यात जीव रंगला आणि रात्रीस खेळ चाले या मालिका टिआरपीच्या आकड्यात पुढे असल्याचं कळते. तरी मात्र या सर्व जुन्या मालिकांना टक्कर देणारी नवी मालिका म्हणजे 'मिसेस मुख्यमंत्री'. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली आहे. 

'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. नुकत्याच या मालिकेने 200 एपिसोड पूर्ण केले आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी सुमी म्हणजेच अमृता धोंगडेनं 200 एपिसोड पूर्ण होत असल्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. शिवाय अभिनेता तेजस बर्वेनेही सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. 

Image may contain: 2 people, people standing

सुमी आणि समरचं प्रेम तर जिंकलं. सुमी समरच्या घरी सुन म्हणून जाते. पण, तिच्या सासूबाईंना ती फारशी पसंत नसल्याने सुमीला कशाप्रकारे घराबाहेर काढता येईल हाच त्यांचा प्रयत्न असतो. आता या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. 

Image may contain: 2 people, people standing and text

समर आणि बबन वर हल्ला होतो. त्यामुळे समरला दवाखान्यातस भरती करण्यात येते. पण, यामागे हात असल्याचा संशय जातो ते शिंदेवर. सुमी त्यावर पोलिस तक्रार करण्याचा निर्णय घेते.पण, सासू अनुराधा तसे करण्यास नकार देते. त्यामुळे यामध्ये अनुराधाचाच हात आहे का ? असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे शिंदे समरला धमकीही देतो.

ही मालिका आता पुढे काय नवीन ट्विस्ट घेऊन येणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. समर आणि सुमी एकत्र लढताना दिसतात. त्यांची ही ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांना चांगली आवडली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Successfully completed 200 Episodes of Mrs. Mukhyamantri today! I'm grateful for the hard work, dedication and love that the entire team of Mrs. Mukhyamantri has put in for the show. And undoubtedly a big big thank you to our fans for your overwhelming love and support. Keep watching Mrs. Mukhyamantri on ZEE MARATHI, every Monday to Saturday at 7:00PM. #ShwetaShinde #Producer #MrsMukhyamantri #ZeeMarathi #PrimeTime #Zee5 #200Episodes #Celebration #Bestshow #TeamWork #BestCast #AmrutaDhongade #tejasbarve @shwetashinde_official @amrutadhongadeofficial @tejas.barve_ @pradipnsh @sushbboy @kiran_dalavi_ @chaitanya_6801 @pankaj259 @dammy_6418 @ajitsinh_4 @rohitchavan1979 @soni.gaikwad @nanachakke @shubhs_22_ @bhaktizanzane @belapurkarrahul @nitin_deshmane @rajubavdekar1 @shivrajnangarepatil @shekhar101sawant @patekar55 @rahul.sorry_5

A post shared by Shweta Shinde (@shwetashinde_official) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi serial Mrs Mukhyamantri completed 200 episodes