ही मालिका सांगेन, 'गुड टच, बॅड टच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

समाजात वावरतांना स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसे व्यक्त व्हावे हे आतापर्यंत ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या पाल्याच्या हितासाठी आहे, असा विषय आता या मालिकेत दाखविण्यात येणार आहे. तो म्हणजे ‘चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा’.

पार्थच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग आणि त्यामुळे हर्षदाच्या भूतकाळातील जागी झालेली कटू आठवण या कथानकावर आधारित एक एपिसोड लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी असणार आहे.

विचित्र, अस्वस्थ करणारे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा प्रत्येकवेळी मुले ते कोणाकडे शेअर करतातच असे नाही. बऱ्याचदा अशा प्रसंगावर बोलले जात नाही कारण मनात एक भिती दडलेली असते. मनात ठेवण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीजवळ हे जर उघडपणे बोललो तर मनाची घालमेल होत नाही, हे सोनी मराठी वरील या मालिकेच्या एपिसोड मधून लहान मुलांना कसे पटवून देता येईल ते सांगितले जाईल.

हर्षदा आणि तुलिकाने आपल्या मुलांच्या बाबतीत जागरुक राहण्यासाठी कोणता स्पर्श कसा आहे हे कसे ओळखायचे याविषयी त्यांना स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांगितले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This marathi serial teach to childrens good touch bad touch