कार्तिकीला लग्नाची भेट म्हणून वडिलांनी दिली 'मर्सिडिज' 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 17 January 2021

लग्नानंतर कार्तिकीने आपला पहिला सण साजरा केला आहे. पहिली मकर संक्रांत साजरी करताना त्याचे फोटो तिनं शेयर केले आहेत.

मुंबई - अवघ्या महाराष्ट्राला आपल्या स्वरांनी वेड लावणा-या कार्तिकीची कीर्ती त्या सारेगमपमुळे सगळीकडे पोहोचली. घराघरात तिचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आलं. तिनंही आपल्या गोड आवाजानं सर्वांना मुग्ध केलं.  कार्तिकीचा विवाहसोहळा मागील वर्षी पार पडला. त्याचे औचित्य साधत कार्तिकीच्या वडिलांनी तिला एक आगळी वेगळी भेट दिली आहे. कर्तिकीनं त्याची पोस्ट शेयर केली आहे.

डिसेंबर महिन्यात कार्तिकीचं लग्न झालं. पुण्याच्या रोनित पिसेसोबत तिचे दोनाचे चार हात झाले. राजेशाही थाटात झालेल्या या विवाह सोहळ्याला कार्तिकीच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आता तिनं वडिलांनी आपल्याला दिलेल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. 
लग्नानंतर कार्तिकीने आपला पहिला सण साजरा केला आहे. पहिली मकर संक्रांत साजरी करताना त्याचे फोटो तिनं शेयर केले आहेत. कार्तिकीने यावेळी हिरवी साडी आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.

सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती त्यानंतर प्रचंड प्रसिध्दी मिळालेल्या कार्तिकीनं मोठा रसिकवर्ग तयार केला. ती सध्या विविध रियॅलिटी शो मध्ये गायन करते. तसेच काही चित्रपटांमध्ये गायनही तिनं केले आहे.

नुकताच कार्तिकीने लग्नातील एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन कार्तिकीने तिचे वडील कल्याणजी गायकवाड यांनी लग्नाच्या निमित्ताने तिला आणि रोनितला दिलेली खास भेट सर्वांना शेयर केली आहे.

गायिका कार्तिकी गायकवाड |Marathi Singer - Kartiki Gaikwad #kartikigaikwad  #maharashtriangirls | Photo, Girl, N girls

कल्याण गायकवाड यांनी आपल्या लेकीला लग्नात मर्सिडीज ई क्लास ही लक्झरी कार भेट म्हणून दिली आहे. कार्तिकीने फोटो शेअर करुन, 'रोनित आणि मला बाबांनी दिलेली ही भेट,' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत तिच्यासोबत तिचे वडील आणि दोन्ही भाऊ दिसत आहेत. या लग्झरी कारची किंमत 60 लाखांपासून सुरु होते.

Vijay Sethupathi Birthday: पिझ्झा ते 96; सुपरस्टार विजयचे डिलक्स परफॉर्मन्स!

सारेगमप लिटिल चॅम्स मराठीच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी विजेती ठरली. त्यानंतर कार्तिकी 'गजर कीर्तनाचा' या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi singer Kartika gaikwad little champ fame father gifted her to Mercedes car