कार्तिकीची लग्नानंतरची पहिली संक्रांत; हळदी कुंकवाचे फोटो पाहिलेत का?

टीम ई सकाळ
Friday, 15 January 2021

 लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीचे फोटो कार्तिकीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पुणे - " सा रे ग म प लिटिल चॅम्स" विजेती गायिका कार्तिकी गायकवाड ही तिच्या सुरेल आवाजाने नेहमीच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. अनेक शो, पुरस्कार वितरण सोहळे यांसह विविध कार्यक्रमांमधून ती गायन करते. "घागर घेऊन निघाली पाण्या गवळण" या गावळणीमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. 

गवळणी, अभंग,भारुड या प्रकारातील गाण्यासांठी कार्तिकीची खास ओळख आहे. संगीताचे धडे आणि वारसा तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. गायनाचं प्रशिक्षण तिने वडील कल्याण गायकवाड यांच्याकडून घेतलं आहे. 

गेल्याच महिन्यात कार्तिकी आणि रोहन पिसे यांचा विवाहसोहळा पार पडला. थाटामाटात झालेल्या विवाहसोहळ्याला कला क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. 

आता लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीचे फोटो कार्तिकीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संक्रातीचे हळदी कुंकू आणि वाण घेताना कार्तिकी या फोटोमध्ये दिसत आहे.

कार्तिकीचे सगळे कुटुंबिय यामध्ये दिसत आहे. हिरव्या साडीत कार्तिकी सुंदर दिसत असून तिने हलव्याचे दागिने देखील घातले आहेत.

कार्तिकीच्या चाहत्यांनी तिला संक्रांतीच्या शुभेच्या दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi singer kartiki gaikwad share sankranti celebration photos