'तिच्यामुळे आईची कमतरता जाणवत नाही'

ऑनस्क्रीन सासू-सुनेचं ऑफस्क्रीन नातं!
'तिच्यामुळे आईची कमतरता जाणवत नाही'

छोट्या पडद्यावर सध्या तुफान लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली'sundara manamdhe bharli . अनेकांना त्यांच्या शरीररचनेवरुन ट्रोल करणाऱ्यांच्या तोंडात खाड्कन मुस्काटात बसावी अशी ही मालिका. बारीक असणं म्हणजेच सौंदर्य या संकल्पनेला या मालिकेतून छेद देण्यात आला आहे. सौंदर्य हे शरीररचनेवर अवलंबून नसतं. तर, ते प्रत्येक व्यक्तीच्या मन, विचार आणि स्वभावावर अवलंबून असतं यावर या मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली. लतिका ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या अक्षयाने अलिकडेच सेटवरील काही मजेदार किस्से सांगितले. यावेळी तिच्या ऑनस्क्रीन सासूबाईंविषयी म्हणजेच अभिनेत्री अतिशा नाईकविषयीदेखील ती व्यक्त झाली. विशेष म्हणजे अतिशा असल्यामुळे सध्या आईची कमतरता भासत नसल्याचं तिने सांगितलं. (marathi-tv-show-sundara-manamdhe-bharli actresss have-close-friendship-feelings-expressed-by-akshaya-naik)

'तिच्यामुळे आईची कमतरता जाणवत नाही'
मुलांना 'या' प्रकारे सांगा तुमच्या घटस्फोटाविषयी

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचं चित्रीकरणासाठी सगळेच कलाकार त्यांच्या कुटुंबापासून दूर आहेत. मात्र, या काळात सेटवर सगळ्यांचा छान घरोबा निर्माण झाला आहे. त्यातच अतिशा नाईक यांच्या प्रेमळ स्वभावामुळे सेटवर वावरताना किंवा काम करताना कोणतीही अडचण येत नाही असं अक्षयाने म्हटलं आहे.

 "अतिशा ताई आणि इंदू यांच्यात बरंचसं साम्य आहे. ती प्रचंड मायाळू आणि कायम मदतीसाठी तत्पर असते. मला वेळोवेळी तिचं मार्गदर्शन मिळत असतं. माझं काम अजून कसं चांगल्याप्रकारे करता येईल यावर ती कायम मला सांगत असते. विशेष म्हणजे तिच्याकडे प्रत्येक समस्येवर तोडगा असतो", असं अक्षया म्हणाली.

'तिच्यामुळे आईची कमतरता जाणवत नाही'
ऑनलाइन मिटींगमध्ये 'या' अ‍ॅक्सिसेरीज खुलवतील तुमचं सौंदर्य

पुढे ती म्हणते, "अतीशा ताईच्या रुपात मला खूप चांगली मैत्रीण मिळाली आहे असंच मी म्हणेन. कारण, ती कधीच कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. सेट असो वा शुटींग संपल्यानंतरचा वेळ आम्ही दोघी प्रचंड गप्पा मारतो.सध्या आम्ही सगळेच घरापासून लांब शुटींग करतोय. पण, अतिशा ताई आमच्यावर इतकं प्रेम करते. की, मला कधीच आईची कमतरता जाणवत नाही".

दरम्यान, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अक्षयाने लतिकाची भूमिका साकारत असून अतिशा नाईक तिच्या सासूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेकदा नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणाऱ्या अतिशा नाईक यावेळी एका प्रेमळ सासूच्या रुपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनयाने त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकून घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com