
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याला घेऊन एक मराठी वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर सज्ज झाली आहे. 'समांतर' अस या वेबसिरीजचं नाव असून अभिनेता स्वप्निल जोशी या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असेल. प्रेक्षकांसाठी खूशखबर म्हणजे या वेबसिरीजचं दिग्दर्शन अनेक दर्जेदार चित्रपट आणि मालिकांची मेजवानी देणारे सतीश राजवाडे यांनी केले आहे.
सध्या सगळ्यांनाच वेबसिरीजचं वेड लागलंय. टिव्ही कमी आणि स्मार्टफोनवर मालिका चित्रपट त्याचबरोबर वेबसिरीज बघण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. चांगला विषय, उत्तम स्टारकास्ट घेऊन आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर निर्माते भर देताना दिसतात. अशाच प्रकारे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याला घेऊन एक मराठी वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर सज्ज झाली आहे. 'समांतर' अस या वेबसिरीजचं नाव असून अभिनेता स्वप्निल जोशी या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असेल. प्रेक्षकांसाठी खूशखबर म्हणजे या वेबसिरीजचं दिग्दर्शन अनेक दर्जेदार चित्रपट आणि मालिकांची मेजवानी देणारे सतीश राजवाडे यांनी केले आहे.
'या' गोष्टीसाठी स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडीतने नाकारल्या अनेक ऑफर्स
'समांतर' या वेबसिरीजमध्ये स्वप्निल 'कुमार महाजन' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. गूढ, रहस्यमयी अशी ही व्यक्तिरेखा आहे. तो संपूर्ण कथानकात कोणाच्या तरी शोधात आहे. 'सुदर्शन चक्रपाणी' नावाच्या व्यक्तिसोबत घडलेल्या घटना आणि त्याच नशीब हे तंतोतंत 'कुमार' सोबत घडत. त्यामुळे कुमार सुदर्शनच्या शोधात बाहेर पडतो. त्याला अशा काही गोष्टी कळतात, ज्याने तो चक्रावून जातो. एका व्यक्तिचा भूतकाळ तेच दुसऱ्या व्यक्तिचा भविष्यकाळ ठरत असताना पुढे काय घडणार याची उत्कंटा प्रत्येक क्षणाला वाढवत नेणारी ही वेबसिरीज एम एक्स प्लेयरवर सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे
गुणी आणि प्रयोगशील अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही समांतरमध्ये स्वप्नीलच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. स्वप्नीलने समांतरच्या माध्यमातून वेबसिरीजच्या दुनियेत पाऊल टाकल आहे. सतीश राजवाडें याच्या दिग्दर्शनाचा तर सवालच नाही. त्यांनी अनेक दर्जेदार मालिका आणि अनेक गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडेंनी केले असताना वेबसिरीजच्या निमित्ताने त्यांचा एक वेगळा दिग्दर्शनीय पैलू लोकांना कळणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
समांतर ही वेबसिरीज केवळ मराठीत नसून हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित झाली आहे. "समांतर ही कथा दुनियादारी फेम प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांची असून ती वेबसिरीजच्या माध्यमातून साकारायला मिळाली हे माझं भाग्य आहे", असे सतीश राजवाडे यांनी सांगितले.