असा रंगला मिसेस मुख्यमंत्र्यांचा लग्नसोहळा!

टीम ईसकाळ
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सुमी आणि समर दोघंही या लग्नसोहळ्यात सुंदर दिसत आहेत. सुमीने गुलाबी रंगाचा शालू त्यावर राणी रंगाचा शेला घेतलाय तर समरने मोती रंगाचा शेरवानी परीधान केलाय व लाल-हिरव्या रंगाचा आकर्षक फेटा बांधलाय. दोघंही एकमेकांना अगदी शोभून दिसताहेत. 

सध्या चर्चेत असलेला लग्नसोहळा म्हणजे सुमी आणि समरचा! 'झी मराठी'वरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिका सध्या रंगात आली आहे, ती सुमी आणि समरच्या लग्नसोहळ्यासाठी. काल (ता. 22) रविवारी मिसेस मुख्यमंत्रीच्या विशेष भागात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. मागचा आठवडाभर ही लगीनसराई सुरू होती. अखेर काल हे शुभकार्य पार पडले अन् सुमी ऑफिशियली मिसेस मुख्यमंत्री झाली. 

भावी मुख्यमंत्री समर पाटील आणि एका खानावळीची मालकीण सुमी यांच्या लग्नाची तयारी गेले काही दिवस सुरू होती. सुमीशी लग्न केल्यानंतर समर मुख्यमंत्री होईल असे कळल्यावर या लग्नाचा घाट घालण्यात आला. मालिकेत त्यांची मैत्री चांगलीच रंगली होती, आता या मैत्रीचं एका सुंदर नात्यात रूपांतर झालंय. दोन दिवसांपूर्वी त्यांचा हळदी व मेहंदी सोहळा पार पडला. तसेच या दोघांचं प्री-वेडिंग फोटोशूटही चांगलंच गाजलं होते. 

mrs mukhyamantri

सुमी आणि समर दोघंही या लग्नसोहळ्यात सुंदर दिसत आहेत. सुमीने गुलाबी रंगाचा शालू त्यावर राणी रंगाचा शेला घेतलाय तर समरने मोती रंगाचा शेरवानी परीधान केलाय व लाल-हिरव्या रंगाचा आकर्षक फेटा बांधलाय. दोघंही एकमेकांना अगदी शोभून दिसताहेत. 

mrs mukhyamamntri

लग्नाला नातेवाईक, मित्रपरिवार, सरपंच, सुमीच्या गावचे लोक, समरच्या घरचे असे सारेच जमले होते. समरची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तर सुमी चक्क सायकलवर लग्नाला आली. यामुळे सगळेजण बघतच राहिले. 

सुमीची सासू म्हणजेच समरची आई खडूस असून फक्त स्वार्थासाठी तिने हा विवाह घडवून आणला आहे. आता पुढे काय होणार हे बघण्यासारखे असेल. 

mrs mukhyamantri


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage celebration at serial Mrs Mukhyamantri