ऐकलं का? अग्गंबाई, सासूबाई होणार आता नवरीबाई!!

टीम ईसकाळ
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अभिजीत आणि आसावरीची सून शुभ्रा यांचे दत्तांजींचं मन वळविण्याचे व लग्नाला संमती देण्यासाठी असंख्य प्रयत्न झाले, मात्र दत्ताजी काही ऐकेनात! पण आता चाहत्यांना सुखद धक्का बसणार आहे.

कोणत्याही तरूण जोडप्याला लाजवेल अशी लव्हस्टोरी सध्या 'अगं बाई सासूबाई'मध्ये सुरू आहे. अभिजीतचं आसावरीवरचं अपार प्रेम आणि आसावरीचे सासरे दत्ताजी यांचा या प्रेमाला असणारा विरोध आतापर्यंत आपण बघत आलो. पण आता या मालिकेला एक इंटरेस्टींग वळण येणार आहे. अभिजीत आणि आसावरीची सून शुभ्रा यांचे दत्तांजींचं मन वळविण्याचे व लग्नाला संमती देण्यासाठी असंख्य प्रयत्न झाले, मात्र दत्ताजी काही ऐकेनात! पण आता चाहत्यांना सुखद धक्का बसणार आहे.

"स्मृती इराणींना या मराठी मालिकेची भूरळ; केला व्हिडिओ शेअर

Image result for aga bai sasubai abhijit asawari

साधारण पन्नाशीच्या वर असलेलं वय, घरात सासरे, मुलगा-सून अशा परिस्थितीत अडकलेली आसावरी (निवेदिता सराफ)... एक यशस्वी शेफ आणि उद्योजक असलेला अभिजीत (गिरीश ओक) एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण आजूबाजूच्या परिस्थितीमुळे व दत्ताजींनी परवानगी दिली नाही म्हणून त्यांना लगेच लग्न करता येत नाही. असावरीची असाह्यता आणि अभिजीतचा असलेला संयमी स्वभाव यांमुळे हे प्रेम टीकून आहे. अभिजीतने दत्ताजींचं मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. तुमच्या सुनेला सुखी ठेवेन ही खात्री दिली, तरी अभिजीत काही दत्ताजींना पसंत पडेना. पण आता अभिजीतने अशी काही जादू केलीय की दत्ताजींनीही या लग्नाला परवानगी दिली आहे. संक्रांती दिवशी दत्ताजी या दोघांच्या लग्नाला परवानगी देतील. तर 19 जानेवारीला या लग्नाचा दोन तासांचा सोहळा झी मराठीवर पार पडेल. 

मृण्मयी देशपांडेचे दिग्दर्शनात पदार्पण; 'मन फकीरा'चे मोशन पोस्टर लॉन्च

मी समाजाचा, नातेवाईकांचा विचार केला, तुझा मात्र कधीच विचार केला नाही, असे म्हणत दत्ताजी आसावरीची माफी मागतात व त्या दोघांच्या लग्नाला परवानगी देतात, असा प्रोमो आजच झी मराठीने शेअर केलाय. 

कालच संक्रांतीनिमित्त हे कुटूंब पतंग खेळण्यात व्यस्त होतं. यात अभिजीत दत्ताजींचा पतंग काटणारच असतो, तेवढ्यात आसावरी त्याला खुणेने असं करू नको सांगते. तो तिचं ऐकतो, त्यामुळे दत्ताजीचं अभिजीतचा पतंग काटतात. मात्र अभिजीत दत्ताजींना म्हणतो की, आमच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात आहे. त्यानंतर दत्ताजी विचार करून लग्नाला होकार देतात अशी शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for aga bai sasubai

या मालिकेत सर्वच नाती अगदी सुंदर दाखवली आहेत. अभिजीत आसावरीचं या वयात एकमेकांना फक्त नजरेनं समजून घेणं. आसावरीची आपल्या सासऱ्यांप्रती असलेली आदरयुक्त भिती. आसावरी आणि सून शुभ्राचं एक मैत्रीचं नातं, आसावरीचं आपला मुलगा सोहमवर असलेलं जीवापाड प्रेम आणि त्याच्यासाठी काहीही करायला तयार असलेला अभिजीत. दत्ताजी आणि कारखानीसांच्या दुर्मिळ मैत्री, असे नात्यांचे अने कंगोरे या मालिकेत दाखविले आहेत. 

'हिरकणी'नंतर प्रसाद ओक पुन्हा सज्ज; 'चंद्रमुखी'चे पोस्टर रिलीज

मालिका सुरू होण्यापूर्वी दाखविल्या जाणाऱ्या ट्रेलमध्येच दाखविण्यात आले होते की, अभिजीत आसावरीचं लग्न होतं. चाहत्यांचं हे अभिजीतसह चाहत्यांचंही हे स्वप्न आता पूर्ण होतंय. वेगळ्या प्रकारचा प्रश्न हाताळल्यामुळे या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. सगळेजण त्यांचे लग्न होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अखेरीस दत्ताजींनी लग्नाला परवानगी दिल्यावर अगदी उत्साहात त्यांचा लग्नसोहळा पार पडेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage ceremony of Abhijit and Asawari on 19 January in serial aggabai sasubai