रणबीरची लगीनघाई...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

चॉकलेट बॉय रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. संजू रणबीरच्या करिअरला कलाटणी देणारा ठरतोय, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, रणबीर करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच ऋषी कपूर यांना लेकाच्या लग्नाचे डोहाळे लागलेत. ‘हीच योग्य वेळ आहे. लवकर लग्नाबाबत विचार कर’ असा सल्ला ऋषी कपूर यांनी रणबीरला दिलाय.

ऋषी यांनी ट्विटर अकाऊंटवरून रणबीरला कानमंत्र दिलाय. या आधी दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींशी रणबीरचं नाव जोडलं गेलं; पण सध्या रणबीर आलिया भट्टला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी आलियाही रणबीरच्या कुटुंबीयांसोबत एकत्र वेळ घालवताना अनेकांनी पाहिलं. त्यामुळे आता लग्नाबाबत दिलेल्या सल्ल्याचा रणबीर गांभीर्याने विचार करणार का, हे पाहाचंय. 

Web Title: marriage of ranbir kapoor