'कपडे काळेच हवेत कारण ती काळी आहे'; शाळेत मुलं तिला चिडवायची

Masaba Gupta has opened up on facing discrimination as a child
Masaba Gupta has opened up on facing discrimination as a child

मुंबई - जग आता एकविसाव्या शतकात जाण्यासाठी काही दिवस दूर असताना अद्यापही वेगवेगळ्या गोष्टींबद्दची संकुचित मानसिकता कायम आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये जात, धर्म, वंश आणि रंगावरुन डिवचण्याचे काम घडत असल्याचे दिसून आले आहे. याबद्दल मॉडेल आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता हिनं आपल्याला आलेल्या वर्णभेदाच्या कटू अनुभवाविषयी एक पोस्ट शेयर केली आहे.

आपल्या मॉडेलिंगच्या क्षेत्रात मानाचे स्थान पटकावणा-या मसाबाला तिच्या दिसण्यावरुन चिडवण्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे ती नाराज झाली होती. अद्यापही आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला तिच्या दिसण्यावरुन ओळखले जाते अशी खंत तिने व्यक्त केली होती. लहान असताना आपल्याला आलेल्या भेदभावाविषयी मसाबानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. तिच्या त्या पोस्टला चाहत्यांनी प्रतिसाद देत तिनं केलेल्या संघर्षाचे कौतूकही केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba (@masabagupta)

मसाबाला आपल्या पालकांच्या असणा-या संबंधांवरुनही अनेकांची टीका सहन करावी लागली आहे. एक ख्यातनाम फॅशन डिझायनर, मॉडेल असणारी मसाबाने यावर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मात्र हे सगळे होत असताना दुसरीकडं आपल्याला लहानपणी रंगावरुन आलेले दाहक अनुभव ती विसरलेली नाही. प्रसिध्द अभिनेत्री नीना गुप्ता यांची कन्या म्हणून मसाबाची वेगळी ओळख आहे. गुप्ता यांनी वेस्टइंडिज क्रिकेटर व्हिव्हिएन रिचर्ड यांच्याशी लग्न केलं होतं. पुढे काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले.

मसाबाने एका मुलाखतीत सांगितले की, अशाप्रकारच्या टीकेला सामोरं जाण्यासाठी तुमच्यात धाडस असणे गरजेचं आहे. त्यामुळे येणा-या प्रसंगाला धैर्यानं तोंड देता येईल. मी ज्यावेळी शाळेत होते तेव्हा मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तो काळ माझ्यासाठी खडतर होता. मित्र कायम माझ्या रंगावरुन मला चिडवत असतं. माझ्यासमोर असताना वेगळं आणि माझ्यापाठीमागे निंदा करण्याचे काम मित्रमंडळी करत असतं. त्याचे मला फार वाईट वाटले. प्रत्येकवेळी ते मला माझ्या रंगाची आठवण करुन देत असतं. खेळायला जाताना मी कुठले कपडे घालायला हवेत तर ते काळ्या रंगाचे कारण काय तर ते माझ्या रंगाला मॅच होतात. असे त्यांचे म्हणणे असायचे.

माझ्या आई वडिलांच्या रिलेशनवरुनही मित्र चर्चा करायचे. मला काही नावेही त्यांनी दिली होती. वास्तवात ती नावे नसून शिव्या होत्या. यासगळ्या विषयी मी जेव्हा आईला सांगायचे तेव्हा तिने मला धीर दिला. ती म्हणाली, यापेक्षाही भयानक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुला अधिक खंबीर व्हावे लागेल. ते तु व्हायला हवं अन्यथा निभाव लागणं कठीण आहे. यामुळे मी अधिक सक्षम झाले. माझा आत्मविश्वास वाढला आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार होत गेल्याचे मसाबाने सांगितले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com