विजयचा ' मास्टर' प्रदर्शित झाला, उसळली गर्दी ;  थिएटर चालकाला दंड  

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

13 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर दक्षिणेकडील राज्यांतील शहरात थिएटरमध्ये जी भयानक प्रेक्षकांची गर्दी उसळली त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.

मुंबई - बहुचर्चित, प्रतिक्षित असा दाक्षिणात्य चित्रपट मास्टरची प्रेक्षक मोठ्या आतूरतेने वाट पाहत होती. अखेर त्यांची ती प्रतिक्षा संपली. कोरोनानंतर सर्वात मोठया बजेटचा आणि चर्चेत असणारा चित्रपट म्हणून मास्टर चित्रपटाचे नाव घेतले जात होते. तसेही साऊथ मध्ये आपल्या आवडीच्या एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा प्रेक्षक तो चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळते.

13 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर दक्षिणेकडील राज्यांतील शहरात थिएटरमध्ये जी भयानक प्रेक्षकांची गर्दी उसळली त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. याचा फटका त्या थिएटर चालकाला सहन करावा लागला आहे. त्याला मोठा दंड यामुळे भरावा लागला आहे. मास्टरचा फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. बुधवारी दुपारी चार वाजल्यापासूनच प्रेक्षकांनी थिएटर बाहेर रांगा लावल्या होत्या. विशेषत चैन्नईच्या वेगवेगळ्या थिएटर बाहेर प्रेक्षक दाटीवाटीनं उभे होते. इतकेच नव्हे तर विजयच्या चाहत्यांनी त्याच्या या नव्या चित्रपटाच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक केला. तसेच वाजत गाजत सिनेमाचे स्वागत केले.

नव्या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून मास्टर या चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. प्रेक्षक त्याची आतूरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे 8 महिन्यांहून अधिक काळ थिएटर बंद होते. त्यामुळे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आधारे चित्रपट पाहावे लागत होते. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. त्याचे झाले असे की, एएनआयच्या माहितीनुसार काशी नावाच्या एका थिएटरच्या मालकाला दंड ठोठावण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी त्याला 5 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. 50 टक्य़ांपेक्षा अधिक प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा नाही असे नियम असतानाही त्यानं त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना सिनेमागृहात परवानगी दिली.

'मला आई व्हायचं नव्हतं, मुलंही नको होती'

तामिळनाडू सरकारने यापूर्वी 100 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेनं थिएटर चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर केंद्र सरकारनं आक्षेप घेतला होता. त्यांनी 50 टक्क्यांचे बंधन घातले. मास्टरला देशभरातील 3800 स्क्रिनवर रिलीज करण्यात आले असून त्यातील 1500 स्क्रिन या हिंदीसाठीच्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: master film Chennai theatre fined for violation of norm screening