Master Movie; दिवस आठवा 188 कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर विजयची दादागिरी

master movie box office collection day 8 earn 188 core Vijay Sethupathi thalapathy Vijay film
master movie box office collection day 8 earn 188 core Vijay Sethupathi thalapathy Vijay film

मुंबई - थलापती विजयचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर दिवाळी साजरी व्हायला लागली. त्याच्या मास्टर नावाच्या चित्रपटानं नवा इतिहास लिहायला घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून देशात असणा-या कोरोनाच्या संकंटाने सर्वांपुढे वेगवेगळे प्रश्न उभे केले होते. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाल्याचे दिसून आले. चित्रपटविश्वाचे धाबे दणाणले होते. आता परिस्थिती सुधारते आहे. विजयचा मास्टर सिनेमा हे त्याचे मोठे उदाहरण म्हणावे लागेल.

थलापती विजय आणि सेतूपती विजय या दोघांची भूमिका असलेला मास्टर हा सिनेमा मागील आठवड्यात प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. आठ दिवसांत मास्टरनं जागतिक पातळीवर तब्बल 188 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिवसाला मास्टर या चित्रपटानं सहा ते सात कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे भारतात मास्टरनं 114 कोटी रुपये कमवून एका आगळ्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. कोरोनाच्या दिवसांतही विजयच्या नव्या सिनेमानं केलेली कमाई सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. लॉकडाऊननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना विविध क्षेत्रांमध्येही बदल झाला आहे. मास्टर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 35 कोटी रुपयांची कमाई केली होती. जी सध्याच्या काळात मोठी झेप म्हणावी लागेल.

मास्टरने केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ऑस्ट्रेलिया, दुबई, या देशांत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दुस-या दिवशी या चित्रपटाची कमाई 19 कोटी तर तिस-या आणि चौथ्या दिवशी 15, 16 कोटी रुपये होती. विजय द मास्टर या सिनेमाची एवढी मोठी क्रेझ प्रेक्षकांना होती की त्यांनी मोठ्या प्रमाणात या सिनेमाचे तिकिट अॅडव्हान्स बुक केले होते.

14 जानेवारीला मास्टरचे हिंदी व्हर्जन प्रदर्शित झाले होते. विजय सेतूपती आणि विजय थलापती यांच्या दोघांचा आतापर्यंतचा हा सर्वात यशस्वी चित्रपट म्हणावा लागेल. याविषयी अधिक माहिती देताना सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी सांगितले होते की, हा चित्रपट म्हणजे त्सुनामीपेक्षा कमी नाही. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा मास्टर बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्याची कथा, अभिनय, संवाद, छायाचित्रण हे सारे प्रभावी आहे. त्यामुळे तो सर्वांच्या पसंतीचा विषय ठरत आहे.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com