
अब्दुच्या आरोपांवर आता MC Stan भडकला! स्टेटमेंट देत म्हणाला, 'बिनबुडाचे आरोप'
बिग बॉस 16 चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो भारत भ्रमंतीवर आहे. त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कॉनर्स सुरु आहेत. त्याचबरोबर तो त्याच्या आणि छोटा भाईजान' अब्दु रोजिक यांच्यातील वादामुळेही चर्चेत आहे.
दोघांमध्ये सध्या काही ठिक नसल्याच बोलल जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील भांडणाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. बिग बॉस 16 मध्ये हे दोघे चांगले मित्र होते. तिथून बाहेर येताच दोघेही एकमेकांच्या विरोधात गेले आहेत.
खरं तर, अब्दू रोजिकच्या टीमने निवेदन जारी केलं होतं. त्या निवेदनात असं लिहिलं आहे की, दोघे नुकतेच बेंगळुरूमध्ये भेटले होते. अब्दूने स्टॅनच्या मॅनेजरशी बोलून सांगितले की त्याला स्टॅनच्या कॉनर्समध्ये सहभागी व्हायचे आहे आणि त्याला पाठिंबा द्यायचा आहे. पण स्टॅनच्या सुरक्षा पथकाने आणि आयोजकांनी त्याला सांगितले की स्टॅनला तो कार्यक्रमस्थळी नको होता.
स्टॅनच्या टीमकडून ही चूक झाल्याचं अब्दूला वाटलं म्हणून मग त्याने तिकीट काढून कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र यानंतर स्टॅनच्या व्यवस्थापकाने अब्दूला शिवीगाळ करत एंट्री गेटवरूनच परत केलं इतकच नाही तर त्याच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असून फलकही फोडण्यात आल्याचं त्याने निवेदनात लिहिले आहे.
आता इतक्या आरोपांनंतर सगळ्याचं लक्ष एमसी स्टॅनच्या वक्तव्याकडे लागले होते आता त्यातच एमसी स्टॅनच्या जवळच्या एका सूत्राने हे आरोप निराधार असल्याचं म्हटले की, 'बिग बॉस संपताच स्टॅन त्याच्या संगीत टूरमध्ये व्यस्त झाला. तो एक स्वतंत्र कलाकार आहे आणि त्याने नेहमीच एकट्याने परफॉर्म केले आहे, त्यामुळे त्याला कोणाशीही सहयोग करायचा नव्हता.
अब्दूचा त्याच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये अपमान झाल्याचा किंवा स्टॅनच्या टीमने त्याच्या कारचे फलक फोडल्याचे दावे पूर्णपणे मूर्खपणाचे आहेत. असे कोणी का करेल? हे सर्व आरोप निराधार आहेत. असं म्हणतं त्यांनी अब्दूने लावलेले आरोप फेटाळले आहे.