मुंबईमधील 'या' स्टुडिओचे होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

वांद्रे येथील मेहबुब स्टुडिओ क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता स्टुडिओचं रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.

मुंबई ः कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर या कोरोनाने कहरच केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत असणारी संख्या चिंताजनकच आहे. मुंबईमध्येही कोरोना विषाणूने हातपाय पसरले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून संपूर्ण देशातच लॉकडाऊन जाहिर करण्यात आलं. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातही मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या पाहता सरकारने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ केली आहे. 

हे ही वाचा - अभिनेते शक्ती कपूर यांनी पायी प्रवास करणाऱ्या मजुरांच्या वेदना केल्या कवितेतून व्यक्त 

नव्याने क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहेत. क्वारंटाईन सेंटरसाठी हॉटेल्स, मोठी मैदानं सरकारने ताब्यात घेतली आहेत. आता एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील मेहबुब स्टुडिओ क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता स्टुडिओचं रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.

Mehboob Studios, Bandra West - Film Studios in Mumbai - Justdial

जवळपास दोन महिने उलटून गेले संपूर्ण चित्रीकरणच ठप्प आहे. सध्यातरी कोणतंच चित्रीकरण सुरु होणं शक्य नसल्याने क्वारंटाईनसाठी स्टुडिओची निवड योग्य आहे. जवळपास 1000 बेडची सोय या स्टुडिओमध्ये करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या स्टुडिओची पाहणी केली आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी या स्टुडिओचा पूर्णपणे कायापालट करण्यात येईल. क्वारंटाईनसाठी लागणाऱ्या साऱ्या सुविधा येथे पुरवण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छता आणि क्वारंटाईन व्यक्तींच्या आरोग्याकडेही योग्य ते लक्ष देण्यात येईल. मेहबुब स्टुडिओमध्ये जागाही तशी प्रशस्त आहे.

त्यामुळे क्वारंटाईनसाठी आलेल्या व्यक्तींना येथे कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. शिवाय पावसाळा देखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशामध्ये क्वारंटाईन झालेली व्यक्ती या स्टुडिओमध्ये सुरक्षित राहिल. इथे सतत चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सुरु असते. मेहबुबमध्ये अनेक बिग बजेट हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. मात्र आता लवकर तरी चित्रीकरण सुरु होण्याची चिन्ह दिसत नाहीत. अशामध्ये क्वारंटाईनसाठी स्टुडिओ ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

mehboob studio to be built quarantine center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mehboob studio to be built quarantine center