म्हणून लोक 'त्याला' कोरोना अशी हाक मारतात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

भयंकर असा अनुभव एका सेलेब्रिटीने दिला आहे. पण लोकांकडून मला किमान संवेदनशील वागणुकीची अपेक्षा आहे. 

मुंबई : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वच देश झटत आहेत. सगळेचजण आपापल्या परीने काम करत आहेत. माणुसकीचा संदेश देत आहेत, अशातच मुंबईत मात्र एका गायकाला जरा वाईट अनुभव आला.... 

मुंबईत मी जात होतो, त्यावेळेला बाईकवरून दोघांनी मला बघून ‘कोरोना’ म्हणून हाक मारली. लोकांच्या अशा वागणुकीचा मला खूप त्रास होतो. असा धक्कादायक अनुभव ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक व अभिनेता चँग मियांगने सांगितला.

coronavirus: शाहरुख खान म्हणतो येणा-या १०-१५ दिवसात करावा लागू शकतो कठीण परिस्थितीचा सामना

जगात सगळीकडेच कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असून लोकांनी, किमान चांगली वागणूक द्यावी. संवेदनशील राहावे असं तो म्हणाला. 

चँगने ‘बॉम्बे टाइम्स’ला मुलाखत दिली होती. त्यात त्याने सांगितले की, ''माझ्या परिवारातील तीन पिढ्यांचा भारतातच जन्म झाला. माझे पूर्वज चीनचे होते. पण माझा जन्म धनबाद येथे झाला.म्हणून मी आता भारतीय आहे.जे लोक मला चायनीज म्हणून चिडवतात त्यांनी मला खुशाल चिडवावं पण त्यांनी मला भारतीय हा शब्द जोडावा''. 

सोशल मीडियावरही चँगला काही लोकांनी कोरोना व्हायरस असं संबोधलं असाही त्याने सांगितलं. त्यातच कहर म्हणजे चँगपासून लांब राहा, असंही त्याचे मित्र बोलतात.या सर्व प्रकारामूळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याच चँग म्हणाला. 

चँग मियांग बद्दल काही माहिती?
चँगने ‘इंडियन आयडॉल ३’मध्ये  भाग घेतला होता.हा शो तो नाही जिंकू शकला पण, त्यामुळे चँग ला सूत्रसंचालनाची बरीच कामं मिळाली.चँगने काही सिनेमा मधेही काम केले आहे. जसे की ‘भारत’,‘बदमाश कंपनी’,‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’,‘सुलतान’ इत्यादी चित्रपट . 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meiyang Chang Said Two Guys On A Speeding Bike In Mumbai Called Me Corona