'सही रे सही' आणि भरतच्या १८ वर्षांपूर्वीच्या आठवणी!

memories of Sahi re Sahi drama of 18 years
memories of Sahi re Sahi drama of 18 years

अत्रे नाट्यसभागृहाचे अभिनेता भरत जाधव यांच्याकडून कौतुक करण्यात आले. नाट्यगृहांमधील अस्वच्छता याविषयी अनेक तक्रारी कलावंत, प्रेक्षक करतच असतात. पण, भारत जाधव यांनी नाट्यगृहातीळ चांगल्या वागणुकीबद्दल भरभरून कौतुक केले. अत्रे नाट्यसभागृह (पिंपरी) ते तीन दिवस राहिले होते. 
पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात भरत जाधव एण्टरटेन्टमेंट निर्मित ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’ या नाटकाची तालीम पार पडली.

याच काळात नाट्यगृहातील सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळाले. नाट्यगृहात चांगल्या प्रकारे स्वच्छता होती, असे जाधव यांना दिसले. म्हणून नाटकाची तालीम संपवून जाधव यांनी सहकार्याबाद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

१८ वर्षांपूर्वी ‘सही रे सही’ या नाटकाची रंगीत तालीम याच ठिकाणी झालेली होती. त्यावेळीसुद्धा अश्याच प्रकारे चांगले सहकार्य मिळाले होते. ‘सही रे सही’ नाटकाने खूप विक्रमी प्रयोग सादर केले. जाधव यांच्या मते, या वास्तूचा आशीर्वाद असावा म्हणून हे यश मिळाले. असा कृतज्ञतेच जाधव यांनी नोंदवहीतही आपला अभिप्राय लिहिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com