#MeToo : गायनाच्या संधीसाठी अनू मलिकने किस मागितले; गायिका श्वेता पंडितचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

या पोस्टमध्ये तिने 'होतकरु गायिकांनी अनू मलिकपासून सावध रहा. ज्या तरुणी आतापर्यंत अनू मलिकच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी समोर येऊन आवाज उठवावा.' असं लिहून आवाहन केलं आहे. ​

मुंबई : संगीतकार-गायक अन्नू मलिक यांच्यावर गायिका सोना माहोपात्राने लैंगिक शोषणकर्ता म्हटलं होतं. त्यानंतर आणखी एका गायिकेने अन्नू मलिक यांच्यावर आरोप केला आहे. ही गायिका आहे श्वेता पंडित. काही बड्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्याच्या बदल्यात आपल्याकडे किस मागितल्याचा आरोप श्वेताने ट्विटरवरुन केला आहे. 

2001 मध्ये 'गायक शान, सुनिधी चव्हाण यांच्यासोबत गाण्याची संधी देईन. पण मला किस द्यावं लागेल.' अशी मागणी अनू मलिक यांनी आपाल्याकडे केली असल्याचं श्वेताने पोस्ट मध्ये म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने 'होतकरु गायिकांनी अनू मलिकपासून सावध रहा. ज्या तरुणी आतापर्यंत अनू मलिकच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी समोर येऊन आवाज उठवावा.' असं लिहून आवाहन केलं आहे. 

श्वेताने आपल्या पोस्ट मध्ये सविस्तरपणे मांडले आहे की, 'जे घडलं ती जखम पुन्हा उघडी करुन पेडोफाईल (लहान मुलांचं शोषण करणारे) आणि लैंगिक शोषण करणारे यांच्याविरोधात बोलणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. 2000 साळी मोहब्बते सिनेमात मला गाण्याची संधी मिळाली. मी तेव्हा किशोरवयीन होते. माझं सगळ्यांनी खूप कौतूक केलं. 2001 मध्ये अनी मलिक यांचे मॅनेजर मुस्तफा यांचा मला फोन आला. त्यांनी मला एम्पायर स्टुडीओमध्ये बोलावलं. मी खूप उत्सुक होते. अनू मलिक यांनी मला म्युझिकशिवाय गायला सांगितलं. 'हर दिल जो प्यार करेगा' हे गाणं मी गायले. ते खूप खुश झाले. ते म्हणाले की, 'मी तुला शान आणि सुनिधी चव्हाण बरोबर गाण्याची संधी देईन, पण आधी मला एक किस दे.' मी घाबरले. मी केव्हा 15 वर्षाची होते. कुणीतरी माझ्या पोटात सुरा खुपसल्यासारखं मला वाटलं. ते माझ्या कुटुंबाला ओळखायचे. मी त्यांना अनू अंकल म्हणायचे. त्यांना दोन मुली असताना ते एका अल्पवयीन मुलीशी असं वागले? यानंतर मी निराश झाले. माझ्या मनावर आघात झाला. मी फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते. पण एका शोषणकर्त्यासाठी मी माझी पॅशन का सोडावी, असा विचार करुन मी लढत राहिले.' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MeToo singer shweta pandit accuses singer anu malik of asking for a kiss to give work opportunity