Bigg Boss OTT 2: बिग बॉस OTT वर दिसणार मिया खलिफा ? सलमान खानसोबत करणार धमाल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss OTT 2

Bigg Boss OTT 2: बिग बॉस OTT वर दिसणार मिया खलिफा ? सलमान खानसोबत करणार धमाल..

सलमान खानच्या मोस्ट अवेटेड शो बिग बॉसच्या दुसरा सीझनमध्ये मोठा धमाका होणार आहे. जिओ सिनेमावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या या शोची तयारी सुरू आहे. एकीकडे शोचा प्रोमो समोर आला आहे आणि दुसरीकडे बिग बॉसच्या घरात बंदिस्त होणार्‍या स्पर्धकांची नावे आहेत. या यादीतील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे अॅडल्ट फिल्म्सची क्वीन मिया खलिफा.

मिया खलिफाला बिग बॉस ओटीटी 2 मध्ये येण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मियाला बिग बॉस 9 साठी देखील बोलावण्यात आले होते. बिग बॉसमध्ये अॅडल्ट स्टार्स येणे ही काही नवीन गोष्ट नाही, हा ट्रेंड सनी लिओनीपासून सुरू झाला आहे.

बिग बॉसनंतर सनीचे करिअर बॉलिवूडमध्ये रॉकेटच्या वेगाने उडू लागले. कदाचित मिया खलिफालाही असेच काहीतरी हवे असेल. कारण तिने अॅडल्ट चित्रपट करणे बंद केले आहे आणि आता तिला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे. मियाचे जगभरातील चाहते या बातमीने खूप खूश आहेत आणि काही जण तिला बिग बॉस ओटीटीवर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

दुसरीकडे, अशीही बातमी आहे की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालाही बिग बॉसमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. अश्‍लील चित्रपट बनवून विक्री केल्याप्रकरणी राजचे नाव समोर आले आहे. तीन महिने तुरुंगात घालवून परत आलेला राज संपूर्ण चेहरा मास्कने झाकून मीडियासमोर येतो. याबाबतचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

टॅग्स :Big Bosssalman khan